manohar parikar in hospital | Sarkarnama

मनोहर पर्रीकर पुन्हा लीलावती रुग्णालयात

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 मार्च 2018

मुंबई : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना सायंकाळी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या काही तपासण्या आणि चाचण्या होणार आहेत. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानंतर ते अमेरिकेत उपचारासाठी जाण्याचा निर्णय घेतील.

मुंबईत उपचारांसाठी येणार असून पुढील उपचारांसाठी अमेरिकेत जाणार असल्याचे सकाळीच मनोहर पर्रीकर यांनी जाहीर केले होते. त्यानंतर अत्यावश्‍यक बैठका आणि चर्चांनंतर ते मुंबईसाठी रवाना झाले. सायंकाळी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 अन्नबाधेमुळे 14 फेब्रुवारीला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या स्वादुपिंडाला कर्करोग झाल्याचे अनौपचारिकपणे सांगण्यात येत असले, तरी त्याबाबत अद्याप कोणतीही माहिती पर्रीकर किंवा लीलावती रुग्णालयाने दिलेली नाही. आठवड्याभराच्या उपचारांनंतर गोव्यातील अधिवेशनासाठी पर्रीकर गेले होते. त्यानंतर पुन्हा ते मुंबईत तपासण्या आणि चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

संबंधित लेख