manohar naik | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कर्नाटक: कुमारस्वामी यांच्या शपथविधीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार

आजचा वाढदिवस : आमदार मनोहर नाईक, पुसद (यवतमाळ) 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 मार्च 2018

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद भागात गेल्या 70 वर्षांपासून सत्ता नाईक घराण्यात कायम आहे. याच मतदारसंघातून राज्याला दोन मुख्यमंत्री मिळाले आहेत. वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्यारुपाने पुसद भागाने राज्याने दोन मुख्यमंत्री पाहिले आहेत. त्याच घराण्यातून आलेले मनोहर नाईक गेल्या 20 वर्षांपासून राजकारणावर त्यांचा प्रभाव आहे. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्यानंतर नाईक घराण्याचा राजकीय वारसा मनोहर नाईक यांच्याकडे आला. 

मितभाषी असलेले मनोहरराव नाईक यांचा या भागात दबदबा आहे. मोदी लाटेतही ते 2014 मध्ये पुसद मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडून आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विदर्भातील ते एकमेव आमदार आहेत. आघाडीच्या काळात त्यांनी विविध खात्याचे मंत्रिपदही भूषविले आहे. पुसद नगरपालिकेवर तसेच जिल्ह्याच्या राजकारणात नाईक घराण्याला ओलांडून अद्यापही जाता येत नाही. याचे श्रेय मनोहर नाईक राजकीय चातुर्याला आहे. 

संबंधित लेख