manmohansingh resign in 1983 whin indira gandhi pm | Sarkarnama

इंदिरा गांधींचे सरकार ऐकत नाही म्हणून मनमोहनसिंग यांनी दिला होता राजीनामा 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली ः आरबीआयचे गव्हर्नर असताना 1983 डॉ. मनमोहन सिंग यांचे म्हणणे तेव्हाचे सरकार ऐकत नव्हते. या कारणास्तव त्यांनी थेट पदाचा राजीनामा दिला होता. हे इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला परवडणारे नसल्याने त्यांनी त्या वेळी मनमोहन सिंग यांचे म्हणणे ऐकले होते अशी माहिती सिंग यांच्या कन्येने दिली आहे. 

नवी दिल्ली ः आरबीआयचे गव्हर्नर असताना 1983 डॉ. मनमोहन सिंग यांचे म्हणणे तेव्हाचे सरकार ऐकत नव्हते. या कारणास्तव त्यांनी थेट पदाचा राजीनामा दिला होता. हे इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला परवडणारे नसल्याने त्यांनी त्या वेळी मनमोहन सिंग यांचे म्हणणे ऐकले होते अशी माहिती सिंग यांच्या कन्येने दिली आहे. 

देशाचा अर्थमंत्री हा रिझर्व्ह बॅंकेच्या (आरबीआय) गव्हर्नरपेक्षा मोठाच असतो. अर्थ मंत्र्याने एखाद्या निर्णयाचा आग्रह धरला तर, गव्हर्नरला त्यास नकार देता येत नाही, असे मत डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांच्या मुलीने लिहिलेल्या पुस्तकात व्यक्त केले आहे. 

वर्ष 2014 मध्ये प्रकाशित झालेल्या 'स्ट्रिक्‍टली पर्सनल मनमोहन अँड गुरुशरण' या पुस्तकात मनमोहन सिंग यांनी आपले मत मांडले असून, स्वतःचे अनुभवही कथन केले आहेत. आरबीआय गव्हर्नर व अर्थमंत्री यांच्यात विचारांची देवाणघेवाण होते. मी गव्हर्नर असतानाही सरकारला विश्वासात घ्यावे लागत होते, अशी कबुली मनमोहन सिंग यांनी या पुस्तकात दिली आहे. अर्थमंत्र्यांचे स्थान हे गव्हर्नरपेक्षा वरचे असते. अर्थमंत्र्यांचा सल्ला घेतल्याशिवाय गव्हर्नरला आपले निर्णय दामटता येत नाहीत.

तसेच, ते अर्थमंत्रयांच्या आदेशाकडेही दुर्लक्षही करु शकत नाहीत, असे केल्यास त्यांना राजीनामा देणे भाग पडते, असे सिंग यांनी या पुस्तकात नमूद केले आहे. 
दरम्यान, स्वायत्ततेच्या मुद्यावरुन केंद्र सरकार व आरबीआयमध्ये खडाजंगी सुरु असून, आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केंद्राला नाही म्हणण्याचा अधिकार बॅंकेला असल्याचे वक्तव्य केले आहे. अशात मनमोहन सिंग यांनी केलेल्या वक्तव्यालाही महत्व प्राप्त झाले आहे. 

जुन्या वादाचा संदर्भ 
सिंग आरबीआयचे गव्हर्नर असताना 1983 मध्ये असाच वाद उभा राहिला होता. मनमोहन सिंग यांचे म्हणणे तेव्हाचे सरकार ऐकत नव्हते. या कारणास्तव त्यांनी थेट पदाचा राजीनामा दिला होता. हे इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला परवडणारे नसल्याने त्यांनी त्या वेळी मनमोहन सिंग यांचे म्हणणे ऐकले होते, असा संदर्भही या पुस्तकात देण्यात आला आहे. 
 

संबंधित लेख