manmad band maratha reservation | Sarkarnama

मराठा आरक्षणासाठी मनमाडला बंद, रेल रोको 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 जुलै 2018

नाशिक ः मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जिल्ह्यात आजही आंदोलनाची धग कायम आहे. मनमाड येथे सकाळ शहरात रास्ता रोको तसेच मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्यानंतर रेल्वे स्थानकात शिरलेल्या आंदोलकांनी रेल रोको केला. त्यामुळे शहर व परिसरातील ग्रामीण भागात आंदोलनाचा परिणाम दिसुन आला. 

मनमाड शहर सकल मराठा समाजातर्फे आज सकाळीच मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्ते, नागरीकांना शहरात प्रमुख रस्त्यांवर फेरी काढुन नागीरकांना बंदचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद मिळाला. शहरात बंदचा परिणाम सर्वच बाजारपेठ व महत्वाच्या भागात दिसुन आला. त्यानंतर मालेगाव चौफुली परिसरात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणा देत मनमाड मालेगाव रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला. 

काही आंदोलक बीएसएनएल च्या मनोऱ्यावर चढल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन केले. प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या निषेधार्थ मुंडन केले. 

शहरातील वाहतुक ठप्प झाली. बस डेपो शहराच्या मध्यवस्तीत आहे. त्यामुळे बससेवाही बंद ठेवण्यात आली होती. सकाळी अकराच्या सुमारास कार्यकर्ते घोषणा देत रेल्वे स्थानकात शीरले. त्यांनी रेल रोको केला. मात्र रेल्वे सुरक्षा दलाने त्यात हस्तक्षेप करीत आंदोलकांनी बाजुला केले. त्यामुळे रेल्वे गाड्या मार्गस्थ झाल्या. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

संबंधित लेख