देशातील तीस महिला खासदारांनी  केली भायखळा कारागृहाची पाहणी 

देशातील तीस महिला खासदारांनी  केली भायखळा कारागृहाची पाहणी 

मुंबई : भायखळा कारागृहातील मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणाचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटले आहेत. महिला कैद्यांचे प्रश्‍न आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी दुपारी देशभरातील सुमारे 30 महिला खासदारांनी वस्तुस्थितीची पाहणी केली.

यासंदर्भातील गोपनीय अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उद्या शुक्रवारी देण्यात येणार असल्याची माहिती या पथकातील सदस्य भाजप खासदार रक्षा खडसे यांनी दिली. 

आसामच्या खासदार बिजॉय चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 30 महिला खासदारांच्या पथकाने गुरुवारी भायखळा कारागृहात जाउन पाहणी केली. या पथकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, एम.के.कनीमोळी यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले 


मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी जेलर मनीषा पोखरकर, महिला पोलीस शिपाई बिंदू नाईकवडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणे यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. हे हत्येप्रकरण उजेडात आले त्यावेळी शिना बोरा हत्येप्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी यांनी कारागृहातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात न्यायालयात जबानी दिली होती.यासर्व प्रकरणाची दखल महिला आयोगाने घेतली आहे. 

मंजुळा शेटये हत्येप्रकरणामुळे कारागृहाच्या भिंतीआड होणाऱ्या अन्यायअत्याचाराचे उघडकीस आले असले तरी सद्यस्थितीत महिला कैदी यांना भेडसावणाऱ्या कोणत्या समस्या आहेत.तसेच महिला कैद्यांचे प्रश्‍न महिला खासदारांच्या पथकाने जाणून घेतले. दोन तास संपुर्ण परिस्थितीची पाहणी केल्यानंतर यासंदर्भातील गोपनीय अहवाल तयार केला गेला आहे. तो शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सादर केला जाणार आहे. 

मंजुळा शेट्ये या महिलेचा 24 जुन रोजी मृत्यू झाला होता. मृत्यूपुर्वी तिच्या लैगिंक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. कारागृहातील हत्येप्रकरणाची विभागीय चौकशी सुरु आहे. त्यात महिला खासदारांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतल्याने मंजुळा शेट्येला न्याय मिळणार का ? असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com