manisha kayande | Sarkarnama

कॉंग्रेस नेते कपाळकरंटे : मनीषा कायंदे

सुचिता रहाटे: सरकारनामा
रविवार, 7 मे 2017

मुंबई : कॉंग्रेस नेत्यांना गोवा निवडणुकीत हाथा-तोंडाशी आलेली सत्तेची संधी साधता आली नाही आणि म्हणे शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे असा पलटवार शिवसेना प्रवक्ता डॉक्‍टर मनीषा कायंदे यांनी केला आहे. झोपी गेलेली कॉंग्रेस आधी जागी करा, अशोकराव, शिवसेनेला तुमच्या सल्ल्याची गरज नाही असा हल्लाबोल शिवसेनेच्या प्रवक्‍त्या मनीषा कायंदे यांनी 'सरकारनामा' शी बोलताना केला. 

शिवसेनेची सत्तेतून बाहेर पडण्याची वाट पाहण्यापेक्षा कॉंग्रेसने विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी सांभाळावी. कॉंग्रेसने सक्षम विरोधी पक्ष म्हणून स्थिरस्थावर व्हावे. कॉंग्रेस आळशीपणा जास्त करीत आहेत. कॉंग्रेसने विरोधी पक्ष म्हणून सरकारवर अंकुश ठेवण्याची गरज आहे.असेही कायंदे यांनी सांगितले. 

कांग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले ते शोधावे आणि ते जागे आहेत का ते पहावे. गोव्यामध्ये हक्काच्या जागा मिळूनही कॉंग्रेसची मोठी नामुष्की झाली. गोव्यात कॉंग्रेसला लोकांनी निवडून दिल्या नंतरही राहुल गांधी यानी कॉंग्रेसच्या नेत्यांचे फोन उचलले नाहीत आणि हाता तोंडाशी आलेली सत्ता गमावली असे कायंदे यावेळी सांगितले. 

शिवसेनेला तुमच्या सल्ल्याची गरज नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लोकांच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सजग आहेत आणि वेळप्रसंगी ते आपल्याच सरकारवर आसूड ओढायलाही मागे पुढे पाहत नाहीत. कॉंग्रेस राष्ट्रवादीमुळे आज राज्यातील शेतकऱ्यांची ही दयनीय अवस्था झालेली आहे. शिवसेनेने नेहमीच शेतकऱ्यांना व कष्टकरी जनतेला न्याय दिलाय आणि त्यांची दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मागील वर्षी दुष्काळात ही एकटी शिवसेना शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभी होती याकडे त्यांनी लक्ष वेधले

संबंधित लेख