manirao thakre birthday | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

आजचा वाढदिवस : माणिकराव ठाकरे, माजी गृहराज्यमंत्री, कॉंग्रेस नेते. 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांचा राजकीय प्रवास यवतमाळ जिल्ह्यातील एका खेड्यातून कॉंग्रेसचा साधा कार्यकर्ता म्हणून सुरू झाला. महाविद्यालयीन जीवनात एनएसयूआयमध्ये सक्रिय असलेल्या माणिकराव ठाकरे यांनी युवक कॉंग्रेसमध्येही वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्यावर 1980 च्या दशकात महाराष्ट्र युवक कॉंग्रेसची जबाबदारी आली. 1985 मध्ये ते दारव्हा या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. गृहराज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. 1995 मध्ये त्यांचा दारव्हा मतदारसंघात पराभव झाला. परंतु त्यांनी संघटनेत केलेल्या कामामुळे त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीच्या विविध पदांवर काम केले.

विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांचा राजकीय प्रवास यवतमाळ जिल्ह्यातील एका खेड्यातून कॉंग्रेसचा साधा कार्यकर्ता म्हणून सुरू झाला. महाविद्यालयीन जीवनात एनएसयूआयमध्ये सक्रिय असलेल्या माणिकराव ठाकरे यांनी युवक कॉंग्रेसमध्येही वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्यावर 1980 च्या दशकात महाराष्ट्र युवक कॉंग्रेसची जबाबदारी आली. 1985 मध्ये ते दारव्हा या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. गृहराज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. 1995 मध्ये त्यांचा दारव्हा मतदारसंघात पराभव झाला. परंतु त्यांनी संघटनेत केलेल्या कामामुळे त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीच्या विविध पदांवर काम केले. 2007 मध्ये त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आली. जवळपास 9 वर्षे त्यांनी प्रदेश अध्यक्षपद सांभाळले. 2014 मध्ये कॉंग्रेस पक्षाच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 2017 मध्ये त्यांची विधान परिषदेच्या उपसभापतिपदी निवड झाली. यवतमाळ जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख आहे. 
 

संबंधित लेख