छगन भुजबळांच्या येवल्याच्या बालेकिल्ल्यात माणिकराव शिंदेंचा जाहिरात सुरुंग? 

येवला म्हणजे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला. येवल्यातील माणिकराव शिंदे म्हणजे भुजबळांचे उजवा हात. शरद पवारांचे निष्ठावंत. मात्र भुजबळांना सध्या वारे फिरले की घराचे वासे देखील फिरतात याची प्रचिती येऊ लागली आहे.
छगन भुजबळांच्या येवल्याच्या बालेकिल्ल्यात माणिकराव शिंदेंचा जाहिरात सुरुंग? 

नाशिक : येवला म्हणजे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला. येवल्यातील माणिकराव शिंदे म्हणजे भुजबळांचे उजवा हात. शरद पवारांचे निष्ठावंत. मात्र भुजबळांना सध्या वारे फिरले की घराचे वासे देखील फिरतात याची प्रचिती येऊ लागली आहे. आज शिंदे यांनी जाहिरातीचा बाऊन्सर टाकत भुजबळ यांनी आपल्याला येवला मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी अशी जाहीर मागणी करीत राजकीय स्फोट घडविला आहे. हा भुजबळांना निवडणुआधीच धक्का मानला जातो आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अॅड. माणिकराव शिंदे यांनी आज माजी उपमुख्यमंत्री भुजबळ यांना जाहिरातीच्या स्वरुपात अनावृत्त पत्र लिहून उमेदवारीची मागणी केली आहे. त्याचा आशय असा की...

.... 13 जुलै, 2004 रोजी आपणच वर्तमानपत्रात येवल्यातून भुजबळ यांनी उमेदवारी करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर मला मुंबईला भेटीचा निरोप दिला. त्यावेळी मला अनेकांचे राजकीय हिशेब चुकते करायचे होते. मतदारसंघांचा सर्वांगीण विकासही करायचा होता. त्यानुसार मी मुंबईत आपल्याला विनंती केली. आपली तीन हजार मतदारांच्या मेळाव्याची अपेक्षा होती. मी वीस हजारांच्या उपस्थितीत मेळावा घेतला. 2004 मध्ये आपण विजीय झाला. त्यानंतर 2009 मध्ये मी शिवसेनेतर्फे तुमच्या विरोधात उमेदवारी केली मात्र पराभव झाला. त्यानंतर 2014 च्या निवडणूकीची सर्व जबाबदारी स्विकारली. राज्यात सत्ता आली नाही मात्र भुजबळ विजयी झाले. तेव्हा पवार साहेब, छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत विधान परिषदेचा सदस्य करु, असे आश्‍वासन दिले होते. मात्र शब्द पूर्ण झाला नाही. त्यामुळे आता येत्या निवडणुकीत मला येवला मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी द्यावी.....

आज सकाळी प्रकाशीत झालेल्या या जाहिरातीने येवलाच नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समीर भुजबळ यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. राज्यात भाजप- शिवसेनेचे सरकार अतिशय नियोजनबध्द पध्दतीने पावले टाकत दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांना फोडण्याचे राजकारण करीत आहे. आघाडीच्या नेत्यांची सत्तास्थाने व पाठबळकमी करण्यासाठी जोरदार हालचाली होत आहेत. अशा स्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि माजी उपमुख्यमंत्री यांचा गृह मतदारसंघ असलेल्या येवल्यातही शिवसेनेकडून जोरदार डाव टाकले जात आहेत. त्यात आगामी विधानसभा निवडणूकीत राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत. अशा स्थितीत शरद पवार यांचे अनुयायी असल्याचा दावा करणारे माणिकराव शिंदे यांनीच जाहिरीताच बॉम्ब टाकल्याने खळबळ उडाली आली. 

हा भुजबळांच्या विधानसभेच्या मार्गात राजकीय सुरुंगाची पेरणी म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. स्वतः शिंदे गेल वर्षभर अजित पवार यांच्याकडे उमेदवारीची मागणी करीत होते. त्यांची पत्नी उषाताई शिंदे अजित पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठींब्यामुळे राज्य पणन संघाच्या अध्यक्षपदी काम करीत आहेत. अशा स्थितीत भुजबळांविरोधात पक्षाकडे जाहिररीत्या उमेदवारीची मागणी भुजबळांच्या राजकीय कौशल्य व प्रतिष्ठेची परिक्षा ठरण्याची चिन्हे आहेत. भविष्यात काय घडामोडी घडतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com