माणिक सरकारही "लक्‍झरी आयकॉन' ?

माणिक सरकारही  "लक्‍झरी आयकॉन' ?

आगरताळा (वृत्तसंस्था) : उंची पेहराव, आलिशान गाड्यांचा ताफा, कोट्यवधींची घड्याळे आणि गॉगल, पायात लाखो रुपयांचे बूट असे सर्वसाधारणपणे आताच्या राजकारण्यांचे चित्र रंगविले जाते. आजच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडतानाच त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या साध्या राहणीमानाचा आदर्शही सांगितला जातो. मात्र, तेही साधे नाही तर इतरांसारखेच आहेत. दाखवायला साधे आहेत. पण त्यांची राहणीमान उच्च आहे अशी टीका होऊ लागली आहे. राज्यातील कॉंग्रेस आणि भाजप नेत्यांनी माणिक सरकार साधे नाहीत तर नाटकी आहेत असे टीकास्त्रही सोडले आहे. 

त्याचे झाले असे की फेसबुकवर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने माणिक सरकार यांच्या राहणीमानाविषयी पोस्ट केली आहे. मुख्यमंत्री सरकार हे आपले संपूर्ण वेतन आणि भत्ते पक्षाकडे देतात. पक्ष त्यांच्या खर्चासाठी केवळ पाच हजार रुपये महिनाकाठी देते. ते 432 स्केअर फुटाच्या घरात राहतात. या घराची किंमत 2.20 लाख रुपये आहे. ते सरकारी गाडी न वापरता दररोज घरापासून मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत चालत जातात. तसेच त्यांची पत्नी सरकारी नोकरीत आहेत. त्याही रिक्षाने जातात. मुख्यमंत्री असून ते इतके साधे आयुष्य जगतात याकडे पक्षाने लक्ष वेधले आहे. 

फेसबुकवरील यांच्या कौतुकाने राज्यातील विरोधी पक्षाचे नेते चांगलेच संतापले असून सरकार यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष बिपलाब कुमार देव यांनी मुख्यमंत्री सरकार यांच्यावर टीका करताना म्हटले आहे, की केवळ फेसबुकवरच नाहीत. त्यांच्याच परिवारातील माकपच्या नेत्यांनी अशीच माहिती पश्‍चिम बंगालमधील एका प्रसिद्ध टीव्ही चॅनेलला आणि नॅशनल मिडियालाही यापूर्वी दिली आहे. त्यांच्या साधेपणाविषयी जे चित्र रंगविले जात आहे ते चुकीचे आहे. मुळात तशी परिस्थिती नाही. आमचे मुख्यमंत्री साधे नाही हे आम्ही वारंवार सांगत आहोत. राज्यात भाजपचा प्रभाव वाढत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा मिळत आहेत. त्यामुळे कम्युनिस्ट पक्षाचे नेते आमच्यावर टीका करीत आहेत. माणिक सरकार यांचा आम्ही पर्दाफाश केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. माणिक सरकार हे काही वर्षापूर्वी केंद्र सरकारच्या सेवेतून निवृत्त झाले आहेत आणि त्यांना चांगली पेन्शनही मिळते. ते कम्युनिस्ट नाहीत तर लक्‍झरी आयकॉन आहेत अशी टीकाही त्यांनी केली. 

काय आहेत आरोप 
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बिरजित सिन्हा यांनीही माणिक सरकारांचा आपल्या शैलीत समाचार घेतला. ते म्हणतात,"" मुख्यमंत्र्यांच्या साधी राहण्याविषयी खोटा प्रचार कम्युनिस्ट पक्ष करीत असून लोकांची दिशाभूल करीत आहेत. मुळात सरकार यांचे राहणीमान उच्च दर्जाचे आहे. ते अतिशय महागडे कपडे, बूट आणि चष्मा वापरतात. त्यांच्या निवासस्थानी वीस कोटी रुपये किमतीची जीम आहे. पन्नास किलो मीटर प्रवासासाठी ते हेलिकॉप्टरही वापरतात. तरीही ते साधे कसे ? याचे उत्तर कम्युनिस्ट पक्षांनी द्यायला हवे. 

दरम्यान, माणिक सरकार यांच्यावर झालेल्या टीकेला उत्तर देण्याची तयारी माकपने दाखविली आहे. याबाबत पक्षातर्फे निवेदन प्रसिद्ध केले जाईल. मुख्यमंत्री सरकार यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क मात्र होऊ शकला नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com