Maneka Gandhi gets angry with Sudhir Mungantiwar | Sarkarnama

नरभक्षक वाघिणीला मारल्याने मेनका गांधी मुनगंटीवारांवर भडकल्या 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

नरभक्षक वाघीण अवनीला ठार करण्याच्या निर्णयावरून मेनका गांधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारण्याचा इशारा दिला आहे.

नवी दिल्ली :  नरभक्षक वाघीण अवनीला ठार करण्याच्या निर्णयावरून प्राणिप्रेमी केंद्रीय मंत्री मेनका गांधी या महाराष्ट्र सरकारवर संतापल्या आहेत. वाघिणीची हत्या हा सरळसरळ गुन्हा असल्याची टीका करताना मेनका गांधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारण्याचा इशारा दिला आहे.

 प्राणिप्रेमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या केंद्रीय महिला व बालविकासमंत्री मेनका गांधी यांनीही राज्य सरकारला धारेवर धरले आहे. आज एकापाठोपाठ एक ट्‌विट करून त्यानंतर एक निवेदन जारी करून मेनका गांधींनी आपला संताप व्यक्त करताना अर्थमंत्री आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लक्ष्य केले आहे.

यवतमाळमध्ये अवनी वाघिणीची ज्या प्रकारे निर्दयी हत्या झाली आहे, त्यामुळे अतिशय दुःख झाले आहे. हा सरळसरळ गुन्हा असून, अनेकांकडून विनंती केली जात असतानाही महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी (वाघिणीला ठार मारण्याचा) आदेश दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे म्हणताना, मेनका गांधींनी शिकारी शफाअत अली खान यांच्या पुत्राला शिकारीसाठी नेण्याच्या सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

संबंधित लेख