मंदाताई  म्हात्रे नवी मुंबईतील व्यापाऱ्यांची मोट बांधणार

बेलापूर आणि ऐरोली विधानसभा मतदार संघात व्यापारी व व्यावसायिकांची मते अनेकदा निर्णायक ठरली आहेत. त्यामुळे ही व्होट बॅंक आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी आमदारमंदाताई म्हात्रे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
Manda-Mhatre
Manda-Mhatre

नवी मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमिवर भाजपने नवी मुंबईतील व्यापारी व व्यावसायिकांची मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. त्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात रविवारी (ता. 16) बैठकीचे आयोजन केले आहे.

 त्यात व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने सोडवणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.

बेलापूर आणि ऐरोली विधानसभा मतदार संघात व्यापारी व व्यावसायिकांची मते अनेकदा निर्णायक ठरली आहेत. गेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसला या दोन्ही गटाच्या मतांचा फटका बसला होता. त्यामुळे ही व्होट बॅंक आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी आमदार म्हात्रे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी रविवारी त्यांनी बैठकीचे आयोजन केले आहे. त्याचे निमंत्रण त्यांनी किरकोळ व घाऊक व्यापारी, हॉटेल व्यवसायिक आणि दुकानदारांना दिले आहे.

मंदाताई म्हात्रे या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष होत्या . राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांच्याशी झालेल्या मतभेदातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करीत २०१४ मध्ये भाजपात प्रवेश केला होता . भाजपच्या तिकिटावर लढताना त्यांनी बेलापूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांना पराभवाचा धक्का दिला होता . मंदाताई म्हात्रे यांची आघाडी १ हजार ४९१ मतांची होती . तेंव्हा राज्यात मोदी लाट असतानाही भाजपला या मतदारसंघात निसटता विजय मिळाला होता . त्यामुळे मंदाताई म्हात्रे खूप आधीपासून तयारीला लागलेल्या आहेत . 

नगरसेविका म्हणून वीस वर्षांपूर्वी  राजकीय प्रवासास सुरवात केलेल्या मंदाताई म्हात्रे यांनी मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये बचत गट, पतंग उत्सव, उद्योग मेळ्याव्यांचे आयोजन केलेले आहे . त्यांनी घणसोली, वाशी, दिवा, सारसोळे आदी ठिकाणी जेट्‌टी, रस्ते, कोळी बांधवांसाठी निवाराशेड आदी मूलभूत सुविधावर भर दिलेला आहे ,  तसेच क्रिडा संकुल, कला केंद्र, समाज मंदिर, व्यायामशाळा निर्माण करण्यास प्राधान्य दिले. आरोग्य शिबिरे, विवाह सोहळ्यांचे आयोजन करून वेगळा पायंडा पाडला आहे . त्या मतदारसंघात सक्रिय आहेत . 
 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com