manase soyabin andolan | Sarkarnama

सोयाबीन : मनसे "स्वाभिमानी'च्या मार्गावर! 

सरकारनामा ब्युराे
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

सातारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांनी सोयाबीन खरेदीबाबत आक्रमक होत खरेदी केंद्रावर हल्लोबोल आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर मनसे स्वाभिमानी शेतकरी संघटनेप्रमाणे आक्रमक भूमिका घेण्याच्या प्रयत्नात आहे. 

जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन झाले आहे. पण ते विक्रीला जाण्यापूर्वीच शासनाने सोयाबीन खरेदीवर निर्बंध घातले. तसेच हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची भुमिका घेतली. तसेच कृषी व पणन मंडळातर्फे जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू केली. पण येथे सोयाबीन घेण्यासाठी विविध जाचक अटी लावण्यात आल्या आहेत. यापार्श्‍वभूमीवर राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. त्यानुसार त्यांनी सोयाबीन खरेदी केंद्रावर हल्लाबोल आंदोलन केले. येत्या दहा दिवसांत शासनाने निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलन केले जाईल, असा इशारा संदीप मोझर यांनी दिला आहे. 

संबंधित लेख