manase | Sarkarnama

मनसेसाठी सात अंक प्रभावशाली! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

मनसेचे मुंबईतील सात नगरसेवक शिवसेनेचा महापौर होण्यासाठी गरजेचे ठरणार आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मराठी माणसाच्या हिताचा निर्णय पक्ष घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे हा पक्ष शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. निवडणुकीआधी राज ठाकरे यांनी दोन्ही पक्षांतील युतीसाठी उद्धव ठाकरे यांच्या "मातोश्री'वर तब्बल सात फोन केले होते. मात्र तिकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नव्हता. आता उद्धव यांनी किमान सात फोन केल्याशिवाय राजसाहेब ऐकतील, असे दिसत नाही. राज यांचे सात वेळा फोन, "राजाला साथ(त) द्या, या गाण्यानुसार सात नगरसेवक निवडून येणे, अशी सध्या सातची धमाल सुरू आहे.

मनसेचे मुंबईतील सात नगरसेवक शिवसेनेचा महापौर होण्यासाठी गरजेचे ठरणार आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मराठी माणसाच्या हिताचा निर्णय पक्ष घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे हा पक्ष शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. निवडणुकीआधी राज ठाकरे यांनी दोन्ही पक्षांतील युतीसाठी उद्धव ठाकरे यांच्या "मातोश्री'वर तब्बल सात फोन केले होते. मात्र तिकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नव्हता. आता उद्धव यांनी किमान सात फोन केल्याशिवाय राजसाहेब ऐकतील, असे दिसत नाही. राज यांचे सात वेळा फोन, "राजाला साथ(त) द्या, या गाण्यानुसार सात नगरसेवक निवडून येणे, अशी सध्या सातची धमाल सुरू आहे. मनसेसाठी "साडे साती' असणे हा सुद्धा याचाच परिणाम आहे का? 

संबंधित लेख