मी घाबरत नाही, घाबरणार नाही ! 

मी घाबरत नाही, घाबरणार नाही ! 

कोलकोत्ता : देशात "सुपर डिक्‍टेटरशिप सुरू आहे. मात्र, सर्व विरोधीपक्ष जर एकत्र आले तर 2019 मध्ये या डिक्‍टेटरशिपला सत्तेवरून खाली खेचण्यात कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वास पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज येथे व्यक्त केला. "" जर कोणी त्यांच्याविरोधात (नरेंद्र मोदींचे नाव न घेता) "ब्र' जरी काढला तर त्याच्या घरी "आयटी', "सीबीआय' किंवा "ईडी'ला पाठवून त्याचा छळ केला जातो. असे असले तरी मी घाबरत नाही, घाबरणार नाही असा इशाराही त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला दिला. 

येथील एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखती ममता बॅनर्जी यांनी देशात हुकूमशाही सुरू असल्याचे म्हटले आहे. प्रत्येकजण भयभयीत असल्याने विरोधक शक्तीमान कसे काय बनू शकतात असा सवालही त्यांनी केला. मात्र केंद्रातील हुकूमशाहना घाबरण्याचे कारण काय ? जर आम्ही सर्वजण एकत्र आलो तर त्यांची हुकूमशाही आम्ही मोडून काढू असे सांगू बॅनर्जी म्हणाल्या, "" केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्वात प्रथम मला लक्ष्य केले गेले. पण, मी मुळीच घाबरले नाही. मी झिरो बनण्यापेक्षा हिरो बनले. मी एक तळागाळातून आलेली कार्यकर्ती आहे. मी लढाऊ आहे आणि जोपर्यंत माझा शेवटचा श्‍वास आहे तोपर्यंत मी लढतच राहणार. त्यामुळे मी माझ्या आयुष्यात कोणालाही घाबरले नाही. त्यामुळेच मी टिकून आहे.'' 

केंद्रातीत हुकूमशाहना न डगमगता जर विरोधक एकत्र आले तर 2019 मध्ये देशातील चित्र निश्‍चितपणे बदलेले दिसेल. आम्ही बदलाची प्रतीक्षा करीत आहोत. आतापर्यंत त्यांच्याविरोधात कोणताही फ्रंट स्थापन झाला नसला तरी विरोधकांनी "सुपर डिक्‍टेटरशिप'विरोधात एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. निश्‍चितीकरण आणि "जीएसटी'नंतर देशातील अनेक उद्योगपतींनी देश सोडला आहे. निश्‍चितीकरणानंतर देशात मोठे संकट आले आहे. पण, सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र केंद्र सरकारने निर्माण केले आहे. मात्र, वास्तव तसे नाही. 

पंतप्रधान कोण? मोदी की शाह ? 
भाजपचे अध्यक्ष अमीत शाह हे केंद्रातील मंत्र्यांची बैठक घेतात."" पंतप्रधान कोण आहे ? नरेंद्र मोदी की अमीत शाह ? असा सवालही ममता बॅनर्जी यांनी यावेळी केला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे ही भाजपचेच होते. मात्र, त्यांचे नेतृत्व सर्वसमावेशक होते. मी स्वत: त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री होते. ते खूप संतुलित आणि निपक्षपाती होते. मी विद्यमान पंतप्रधानांवर टीका करीत नाही. पण, त्यांच्या पक्षाने काळजी घेतली पाहिजे. मी काय खाते, कोणता पोशाख करते. मी कोणत्या शाळेत जात होते, मी कोणत्या धर्माला पाठिंबा देते ? असल्या चौकशी का म्हणून केल्या जात आहेत ? देशात शिक्षणाचे भगवेकरण सुरू आहे ? यासर्व गोष्टी काय दर्शवितात ? मुळात असल्या हुकूमशाहीलाच माझा विरोध आहे आणि मी त्याविरोधात लढतच राहणार असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com