mamta banarjee attack bjp nrc issue | Sarkarnama

"तृणमूल'च्या शिष्टमंडळास विमानतळावर रोखले 

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

सिल्चर (आसाम) : आसाममधील बहुचर्चित राष्ट्रीय नागरिक नोंदणी मसुद्याचे (एनआरसी) राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत असून, तृणमूल कॉंग्रेसने हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनविला आहे. आज दुपारी येथील विमानतळावर आलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या आठ सदस्यीय शिष्टमंडळाला रोखून धरण्यात आले.

या शिष्टमंडळामध्ये "तृणमूल'च्या आमदार आणि खासदारांचा समावेश आहे. या घटनेनंतर पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त करतानाच ही महाआणीबाणी असून, आमच्या नेत्यांना मारहाण झाल्याचा आरोप केला. 

या घटनेचा निषेध म्हणून तृणमूल कॉंग्रेसकडून उद्या (ता. 3) लोकसभेत हक्कभंगाचा ठराव मांडला जाऊ शकतो. तृणमूलचे खासदार सुखेंदू शेखर रे यांनी सांगितले, की ""आमच्या भेटीमुळे तणाव निर्माण होऊ शकतो असे सांगत पोलिसांनी आम्हाला रोखले.'' पोलिसांनी या नेत्यांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी थेट कुंभीग्राम विमानतळावरील व्हीआयपी लाउंजमध्ये केली. 

जमावबंदीचे आदेश 
सध्या सिल्चरमध्ये जमावबंदीचे आदेश देण्यात आले असून, पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे, असे कच्छर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. आसाम सरकारच्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी तृणमूल कॉंग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी विमानतळाबाहेर आंदोलन केले. या पथकामध्ये "तृणमूल'चे खासदार सुखेंदू शेखर रे, काकोली घोष दस्तीदार, रत्ना डे नाग, नंदीमूल हक आणि अर्पिता घोष यांच्यासह मंत्री फिरहाद हकीम आणि आमदार मोहुआ मोईत्रा यांचा समावेश आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख