mallikarjun kharge speech in faizpur | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

भाजप नेत्यांच्या घरातील कुत्रातरी मेला कां? : मल्लीकार्जून खरगे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

गेल्या साडेचार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ "खोटे बोलणे' एवढेच काम केले आहे. 

जळगाव : महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासह अनेक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी देशासाठी बलीदान दिले. परंतु भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांच्या घरातील कुत्राही मेला नाही आणि आज हे देशप्रेमाचे आव आणत आहेत. परंतु देशासाठी त्यांचे योगदान काय?, अशी टीका कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लीकार्जून खरगे यांनी केली. 

देशातील व राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात जनतेला जागृत करण्यासाठी कॉंग्रेसतर्फे राज्यभर जनसंघर्षयात्रा काढण्यात येत आहे. त्या अंतर्गत फैजपूर येथून दुसऱ्या टप्प्यातील यात्रेस प्रारंभ झाला. धनाजी नाना महाविद्यालयाच्या मैदानावर कॉंग्रेसच्या नेते मल्लीकार्जून खरगे यांच्या हस्ते ज्योत पेटवून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी खरगे म्हणाले, कॉंग्रेसने सत्तर वर्षाच्या काळात देशाचा विकास केला केला आहे. सात लाख गावाना वीज दिली, काश्‍मीर ते कन्याकुमारी रस्त्याने जोडले, या शिवाय सर्वच क्षेत्रात प्रगती केली. परंतु गेल्या साडेचार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ "खोटे बोलणे' एवढेच काम केले आहे. 

यावेळी व्यासपीठावर राज्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, विधासभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार भाई जगताप, माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रवक्ते सचीन सावंत, हुसेन दलवाई, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष संदीप पाटील,आदी उपस्थित होते. प्रारंभी माजी आमदार शिरीष चौधरी, माजी उल्हास पाटील यांनी प्रस्ताविक केले. 

संबंधित लेख