malishak, swabhimani sanghatan, nitesh rane, mumbai | Sarkarnama

वाघोबा करतो म्याव म्याव..आम्ही आणि मलिष्का बहीण भाव!!

सुचिता रहाटे 
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

मुंबई : "" सोनू , तुला "बीएमसी'वर भरोसा नाय काय...या गाण्याने वादग्रस्त ठरलेल्या आरजे मालिष्काने शिवसेनेची नाराजी ओढून घेतली. त्यामुळे शिवसैनिकांकडून मालिष्काला टार्गेट केले जात आहे. रक्षाबंधनाच्या दिवसाचे औचित्य साधून मालिष्काला संरक्षणासाठी स्वाभिमानी फौज देण्याचे आश्‍वासन दिले आहे अशी माहिती कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांनी 'सरकारनामा' दिली. 

आल्यावर ते मालिष्काला भेट घेणार आहेत असे त्यांनी सांगितले. रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या नात्याचा पवित्र सण मानला जातो. मात्र, सामाजिक बांधिलकीतून रक्ताच्या नात्याचा पलीकडेही काही बहीण-भावासारखी नाती जपली जातात. तेंव्हा भाऊ आपल्या बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो. त्याचे बोलके उदाहरण म्हणजे मलिष्काच्या संरक्षणासाठी नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी रक्षाबंधनाचे औचित्य साधत मालिष्कला भेट देणार आहेत. आम्ही सख्या भावासारखे तुझ्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही नितेश राणे यांनी दिली आहे. 

मालिष्काने बीएमसीच्या भोंगळ कारभाराबाबत विडंबनात्मक गाणे गायले होते. त्यावर शिवसेनेने तिच्यावर डूख धरत तिला प्रचंड त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी मालिष्काला पाठिंबा देत, तू घाबरू नको आम्ही तुझ्या सोबत आहोत असे आश्वासन दिले होते. यासगळ्यात नितेश राणे यांनी सुद्धा काही गाण्याच्या पंक्तीं मधून मालिष्का बहीण मानत तिला पाठिंबा दिला. त्यामुळेच आज रक्षाबंधनाच्या दिवशी स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते मालिष्काला नितेश राणेंकडून राखीपौर्णिमेची भेट देणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. 

संबंधित लेख