मालेगाव बाँबस्फोट प्रकरण : ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांना जामिन मंजूर

पुरोहित गेल्या आठ वर्षांपासून तुरुंगात आहेत. मात्र, अद्याप त्यांच्याविरुद्ध आरोप निश्‍चित करण्यात आले नसल्याने जामीन मिळावा, असे पुरोहितचे वकील हरिश साळवे यांनी सुनावणीदरम्यान नमूद केले होते. त्यानुसार त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणातील अन्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे.
मालेगाव बाँबस्फोट प्रकरण : ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांना जामिन मंजूर

नवी दिल्ली : 2008 मधील मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला.

पुरोहित यांनी तात्पुरता जामीन मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने जामीन मंजूर केला. कर्नल पुरोहित हे गेल्या 8 वर्षांपासून कारागृहात होता. न्यायाधीश आर. के. अग्रवाल आणि न्यायाधीश ए. एम. सप्रे यांच्या खंडपीठाने आज जामीन मंजूर करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) जामीन देण्यास विरोध केला होता.

पुरोहित गेल्या आठ वर्षांपासून तुरुंगात आहेत. मात्र, अद्याप त्यांच्याविरुद्ध आरोप निश्‍चित करण्यात आले नसल्याने जामीन मिळावा, असे पुरोहितचे वकील हरिश साळवे यांनी सुनावणीदरम्यान नमूद केले होते. त्यानुसार त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणातील अन्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे.

यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने पुरोहितचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याविरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने प्रज्ञासिंह ठाकूरला दिलेल्या जामिनाला या स्फोटात मरण पावलेला निसार अहमद हजी सैय्यद बिलाल याच्या वडिलांनी या जामिनाला आव्हान दिले होते. प्रज्ञासिंह ठाकूर या शक्तीशाली महिला असून, त्या या प्रकरणातील पुराव्यांवर प्रभाव टाकतील, असे त्यांचे म्हणणे होते. मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या स्फोटात सात जण ठार झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com