Make Satellite a CM - Criticism of Uddhav Thakre | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

तुम्ही खुर्चीवर कशाला? उपग्रहालाच मुख्यमंत्री बनवा - उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

हरी तुगावकर
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

शिवसेनेच्या वतीने मंगळवारी (ता. २३) येथे गटप्रमुखांचा मेळावा झाला. पण कार्यकर्त्यांची गर्दी जमवून शक्तीप्रदर्शनही झाले. यावेळी ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य न करता भारतीय जनता पक्षाला आणि त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. सत्तेत असूनही आपल्यात सवतासुभा आहे हेही त्यांनी दाखवून दिले.

लातूर : दुष्काळ जाहीर करण्यात होत असलेल्या विलंबावर आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कडाडून टीका केली. उपग्रहाकडून सर्वेक्षण करुन मग दुष्काळ जाहीर करण्याच्या निर्णयाचाही ठाकरे यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांची गरजच नाही, उपग्रहालाच मुख्यमंत्री बनवा, असा टोला ठाकरे यांनी लगावला. 

गेल्या अनेक निवडणुका भारतीय जनता पक्षाने राम मंदिराचा मुद्दा ऐरणीवर घेवून हिंदूत्वाची मते घेण्याचा प्रयत्न केला. त्यात यशही आले. परंतु सध्याचे स्पष्ट बहुमत असलेले केंद्रातील नरेंद्र मोदींचे सरकारने मात्र या मुद्दाकडे दुर्लक्ष केले आहे. हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेने हा मुद्दा हायजॅक केला आहे. येथे मंगळवारी (ता. २३) झालेल्या शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात तर श्रीरामाची मोठी मूर्तीच व्यासपीठावर ठेवण्यात आली होती. इतकेच नव्हे तर मोदी सरकार हे भंपक सरकार आहे, अशी टीका करीत आपण ता. २५ नोव्हेंबरला आयोध्येत जाणार असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे येत्या निवडणुकीत शिवसेना श्रीराम मंदिराचा मुद्दा लावून धऱणार आता हे स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेच्या वतीने मंगळवारी (ता. २३) येथे गटप्रमुखांचा मेळावा झाला. पण कार्यकर्त्यांची गर्दी जमवून शक्तीप्रदर्शनही झाले. यावेळी ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य न करता भारतीय जनता पक्षाला आणि त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. सत्तेत असूनही आपल्यात सवतासुभा आहे हेही त्यांनी दाखवून दिले. मोदी हे खोटे बोलून सत्तेवर आले आहेत. आता निवडणुकीत पुन्हा ते तुमच्या समोर येतील. अच्छे दिन...असे म्हणती, त्यावेळी तुम्ही कहाँ है अच्छे दिन असे म्हणा, असा संदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

राम मंदिर, ३७० कलम, समान नागरी कायदा हे सर्व विषय न्यायालयात आहेत असे सांगून वेळकाढूपणा केला जात आहे. हे सरकार किती खोटे आहे हे घरा घरात जावून सांगा असे आवाहन, त्यांनी केले. निवडणुकीत महाराष्ट्रात येवून २७ सभा घेणारे मोदी आता राज्यात दुष्काळ पडला असताना कोठे आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री फडणवीस हे काय पंचांग पाहून दुष्काळ जाहिर करणार आहेत का?, त्यांना जनतेचा आक्रोश दिसत नाही का? उपग्रहाद्वारे मॅपिंग करून त्याचा अहवाल आल्यानंतर दुष्काळ जाहीर करणार म्हणे, मग तुम्ही खुर्चीवर बसता कशाला, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका, असा उपरोधिक टोलाही ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना मारला.

मी सरकारच्या विरोधात नाही तर जनतेच्या बाजूने बोलतो. जनतेचे प्रश्न मांडणारच. सरकार चूकत असेल तर आसूड ओढणारच. जनतेच्या पाठबळावर पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असा विश्वासही ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्राच्या राजकारणात 2019 मध्ये सरशी कुणाची? - वाचा सरकारनामा दिवाळी अंक - येथे क्लिक करा आणि आजच सवलतीच्या दरात मागणी नोंदवा

संबंधित लेख