Majalgaon Muslim and Maratha Family's Boycott on Education | Sarkarnama

मराठा आरक्षण मिळेपर्यंत शिक्षणावर बहिष्कार : राजेवाडीच्या मुस्लीम आणि मराठा पालकांनी घेतला निर्णय 

पांडुरंग उगले 
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मराठा आरक्षणासाठी मागील वीस दिवसापासून राज्यभर आंदोलने सुरु आहेत. या आंदोलनाला राजेवाडी येथील सकल मुस्लीम समाजाने पाठींबा दिला असून जोपर्यंत मराठा समजला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमच्या मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.

माजलगाव (जि. बीड) : मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनाला राजेवाडी येथील मुस्लीम समाजाने पाठींबा देत मुलांच्या शिक्षणावर बहिष्कार टाकला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शिक्षणासाठी पाठविणार नसल्याचा निर्णय राजेवाडी येथील सकल मुस्लीम, मराठा समाजाने घेऊन बुधवारपासून वेगळे आंदोलन छेडले आहे.

राजेवाडी येथील पहिली ते चौथी पर्यंत असलेल्या जिल्हा परिषद शाळेत एकूण १८९ विद्यार्थी संख्या आहे. यात २५ ते ३० विद्यार्थी मुस्लीम समाजाचे, शंभरच्या आसपास मराठा समाजाचे तर उर्वरीत ईतर समाजाचे विद्यार्थी शिक्षण घेतात.

मराठा आरक्षणासाठी मागील वीस दिवसापासून राज्यभर आंदोलने सुरु आहेत. या आंदोलनाला राजेवाडी येथील सकल मुस्लीम समाजाने पाठींबा दिला असून जोपर्यंत मराठा समजला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमच्या मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचा निर्णय घेत मुस्लीम समाजाच्या सर्वच पालकांनी बुधवारी (ता.आठ) शाळेच्या मुख्याध्यापकाला निवेदन देऊन मुलांची शाळा बंद केली. यात मराठा समाजानेही शिक्षणावर बहिष्कार घालत पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेत आगळेवेगळे आंदोलन सुरु केल्याने बुधवारी शाळेत जेमतेम तीस, चाळीस विद्यार्थीच उपस्थित होते.

संबंधित लेख