... आणि भाजप आमदार आर. टी. देशमुखांना धक्काबुक्की झाली

धक्काबुकीचा प्रकार झाला नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेने मला प्रश्न विचारले. मी दिलेल्या उत्तराने त्यांचे समाधानही झाले; परंतु दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून मी तिथेच थांबलो.-आर. टी. देशमुख, भाजप आमदार, माजलगाव
beed-news.
beed-news.

बीड : भाजप आमदार आर. टी. देशमुख यांना बुधवारी लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला. चार वर्षांत गावात एकही विकास काम केले नाही असा जबाब विचारत आमदार देशमुख यांच्यासह भाजप तालुकाध्यक्ष हनुमान कदम, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष गोरख धुमाळ यांच्यासह पीए आणि वाहन चालकांना धक्काबुक्की झाली.

विशेष म्हणजे भाजपाकडून इच्छुक असलेले मोहन जगताप भाषण अटोपून निघून गेले हेाते.

गुरुवारी आमदार आर. टी. देशमुख यांना याचा अधिकच फटका सहन करावा लागला. माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम अटोपून परतत असताना गावातील विविध पक्षांच्या युवकांनी त्यांचे वाहन अडविले.

‘आमच्या गावात चार वर्षात एकही विकास काम का केले नाही’, ‘मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी का झाला नाहीत’ असे म्हणुन त्यांना वाहनाच्या खाली खेचत  त्यांच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. त्यांच्यासह भाजप तालुकाध्यक्ष हनुमान कदम, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष गोरख धुमाळ, स्विय्य सहाय्यक श्री. पवार आणि वाहन चालकालाही यावेळी धक्काबुक्की करण्यात आली.

त्यांना कार्यक्रमासाठी बोलविलेल्या जयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना एका मंदिराजवळ आणले. यानंतर सहाय्यक पोलिस अधीक्षकांसह घटनास्थळी दंगल नियंत्रण पथक आणि पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना गावातून काढून देण्यात आले.   


मोहन जगताप अगोदरच गेले

दरम्यान, या जयंती कार्यक्रमाला भाजपकडून सध्या इच्छुक असलेले मोहन जगताप हे देखील उपस्थित होते. मात्र, भाषण अटोपून काम असल्याचे सांगत ते निघून गेले होते. या गावात त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत. जगताप काम असल्यानेच निघून गेले कि त्यांना याचा अंदाज होता हे त्यांनाच ठाऊक.  

सरकारी ठेकेदारीचा मुळ व्यवसाय असलेले आर. टी. देशमुख पुर्वी काँग्रेस पक्षात  होते. नंतर दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडेंशी जवळीक होऊन ते भाजपमध्ये  आले. पंचायत समिती सभापती राहीलेल्या देशमुख यांनी २००९ मध्ये माजलगाव  मतदार संघातून भाजपकडून निवडणुक लढविली. मात्र, त्यांना पराभव पत्करावा  लागला. २०१४ मध्ये मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांचा  मोठ्या फरकाने पराभव केला.

दरम्यान, सुरुवातीपासूनच त्यांच्या आमदारपदाच्या कार्यशैलीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अनेक ठिकाणी पक्षाचे उमेदवार देता न   येणे, काही निवडणुकांत राष्ट्रवादीसोबतच आघाडी करणे असे प्रकार घडल्याने त्यांना नेहमी विरोधकांसह स्वपक्षीयांच्या टिकेचे धनी व्हावे लागते.

अगोदरच भाजप आमदार आर. टी. देशमुख यांच्याबद्दल मतदार संघात नाराजी आहे. त्यांची उमेदवारी बदलण्याबाबतही हालचाली सुरु आहेत. आता त्यांना झालेली विकास कामे आणि मराठा आरक्षण या दोन कारणांनी रोषाचा सामना सहन करावा लागला. भाजपकडून इच्छुक असलेले मोहन जगताप भाषण करताच निघून गेले हे यातील विशेष. 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com