maitri parishad in karad | Sarkarnama

मोदी, फडणवीसांना टार्गेट करणाऱ्या कार्यक्रमाला आठवले! 

सरकारनामा ब्युराे
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

कऱ्हाड : पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून दलितांवरील अत्याचार वाढले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कऱ्हाडात दलित महासंघाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उद्या (गुरूवारी) दुपारी एक वाजता यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात मैत्री परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उद्‌घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती दलित महासंघाचे संस्थापक प्राध्यापक डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 

प्रा. डॉ. सकटे म्हणाले, कोल्हापूर येथील बिंदू चौकात पाच जुलै 1992 ला दलित महासंघाची स्थापना झाली. 25 वर्षांत संघटनेचे काम राज्यभरात सुरू केले. केवळ राज्यातच नव्हे तर आंध्रप्रदेश, कर्नाटक, गोवा येथे दलित महासंघाच्या शाखा आहेत. कार्यकर्त्यांच्या योगदानामुळेच संघटना जनमानसात टिकून आहे. संघटना चालवणे सोपी गोष्ट राहिलेली नाही. प्रस्थापित राजकारण्यांनी लावलेल्या वाईट सवयीमुळे आमच्या सारख्यांची संघटना चालवताना पंचाईत होते. केवळ समाज व कार्यकर्त्यांनाच या संघटनेचे श्रेय आहे. संघटनेचा 26 वा वर्धापन दिन कोल्हापुरात साजरा करण्यात आला. त्यावेळी कुऱ्हाड परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शताब्दी वर्ष सुरू होत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्यावेळी दैनिक काढण्याचे ठरवले होते. त्या दैनिकाचे नाव "कुऱ्हाड' असे जाहीर केले होते. मात्र ते दैनिक सुरू झाले नाही. त्यामुळे कोल्हापूरमध्ये कुऱ्हाड परिषद घेण्यात आली. दलित महासंघाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मैत्री परिषद होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून दलितांवर अत्याचार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर ही मैत्री परिषद होत आहे. यावेळी रिपाईंचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड उपस्थित राहतील. तसेच नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, किशोर तपासे, माजी नगराध्यक्ष अशोक भोसले उपस्थित राहतील. या परिषदेस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. डॉ. सकटे यांनी केले आहे. 
 
संबंधित लेख