mahesh manjrekar meets ashok chavhan in kolhapur | Sarkarnama

महेश मांजरेकर अशोक चव्हाणांना भेटले; राज ठाकरेंची साथ सोडणार? 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

मनसे अधयक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आज कोल्हापुरात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली. त्यामुळे मांजरेकर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशी हवा तयार झाली आहे. 

पुणे: मनसे अधयक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आज कोल्हापुरात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली. त्यामुळे मांजरेकर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशी हवा तयार झाली आहे. 

मांजरेकर यांनी मनसेतर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. सद्या कोल्हापुरातून कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला सुरवात झाली आहे. सर्व प्रमुख नेते कोल्हापुरात आहेत. यावेळी मांजरेकर यांनी चव्हाणांची भेट घेतली. त्यामुळे मांजरेकर मनसेत नाराज असल्याची, तसेच ते लवकरच कॉंग्रेस प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली. दरम्यान, आपण शुटींगसाठी कोल्हापुरात असल्याने मित्र म्हणून अशोक चव्हाणांना भेटल्याचे मांजरेकर यांनी सांगितले. 

संबंधित लेख