mahesh landange maratha reservation | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

मराठा समाजाच्या आरक्षणसाठी जीवाचे रान करणार, आमदार महेश लांडगेंचा निर्धार 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 जुलै 2018

पिंपरी ः मी मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. तसेच ते मिळवियासाठी जीवाची बाजी लावणार आहे. हे सरकार व याच मुख्यमंत्र्यांकडून ते मिळविणार आहे, असा निर्धार भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आज केला. मी मराठा असल्याने समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गप्प बसणार नाही, असेही ते म्हणाले. 

पिंपरी ः मी मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. तसेच ते मिळवियासाठी जीवाची बाजी लावणार आहे. हे सरकार व याच मुख्यमंत्र्यांकडून ते मिळविणार आहे, असा निर्धार भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आज केला. मी मराठा असल्याने समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गप्प बसणार नाही, असेही ते म्हणाले. 

मी स्वत तसेच कॉंग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना आदी प्रमुख पक्षांचाही मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याने ते निश्‍चीत मिळेल.अडचण फक्त ही न्यायालयाची आहे. हे प्रकरण न्यायालयात गेलेले आहे.तेथून ग्रीन सिग्नल आला,की लगेच ते देण्याची मागणी मी स्वत करणार आहे. तसेच त्यासाठी राज्य सरकार व मुख्यमंत्री हे सुद्धा सकारात्मक आहेत. प्रमुख विरोधी पक्षांचाही अडसर नाही. त्यामुळे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. ते घेतल्याशिवाय गप्पही बसणार नाही. हेच सरकार व मुख्यमंत्री यांच्या काळातच ते मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा आहे. हे आरक्षण मिळविण्यासाठी मी विधिमंडळात आणि रस्त्यावर देखील अनेकवेळा आवाज उठविला आहे असे सांगून ते म्हणाले, की मी अपक्ष आमदार असलो तरी विकासाच्या मुद्यावर फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. या सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वतंत्र कायदा केला. मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे धोरण आखले, अण्णासाहेब विकास महामंडल सक्षम केले त्यातून अनेक बेरोजगार तरूणांना रोजगार मिळण्याची संधी उलब्ध सारथी नावाची संस्था काढून कौशल्य विकास कार्यक्रम सुरू केला आहे. 

 

संबंधित लेख