Mahesh Bhagwat honour by US home department | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

पाथर्डीच्या महेश भागवतांचा अमेरिकेत डंका : मानवी तस्करी विरोधात चालविलेल्या मोहिमेचा गौरव

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 2 जुलै 2017

पुणे : मानवी तस्करी विरोधात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना अमेरिकेच्या गृह खात्याकडून "ट्रफिकिंग इन पर्सन रिपोर्ट हिरो ऍवार्ड' देण्यात येते. यंदाचा हा पुरस्कार मूळचे महाराष्ट्रातील पाथर्डी येथील असलेले व सध्या तेलंगणातील राचकोंड येथील पोलिस आयुक्त महेश भागवत यांना जाहीर झाला.
 

पुणे : मानवी तस्करी विरोधात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना अमेरिकेच्या गृह खात्याकडून "ट्रफिकिंग इन पर्सन रिपोर्ट हिरो ऍवार्ड' देण्यात येते. यंदाचा हा पुरस्कार मूळचे महाराष्ट्रातील पाथर्डी येथील असलेले व सध्या तेलंगणातील राचकोंड येथील पोलिस आयुक्त महेश भागवत यांना जाहीर झाला.
 
हा पुरस्कार अमेरिकेचे गृहमंत्री टिलरसर आणि सल्लागार इवांका ट्रम्प यांनी जाहीर केला. मूळचे नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील असलेले महेश मुरलीधर भागवत हे कर्तव्यदक्ष आणि कठोर पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जातात. गेली 13 वर्षे त्यांना मानवी तस्करी विरोधात लढा पुकारला आहे. बालके, महिला यांची तस्करी कामगार म्हणून किंवा लैंगिक शोषणासाठी केली जाते. ती थांबविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. देशातीय या पूर्वी दोन पोलिस अधिकाऱ्यांना हा पुरस्कार मिळाला होता. भागवत यांच्या रूपाने तिसऱ्या भारतीयाला हा पुरस्कार मिळाला आहे. 

भागवत हे युपीएससी आणि इतर शासकीय सेवांसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे "रोल मॉडेल' आहेत. पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयात या परीक्षांचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी त्यांचे फॅन आहेत. सुरवातीला त्यांना त्रिपुरा केडर मिळाले होते. त्यानंतर ते आंध्र केडरमध्ये नियुक्त झाले. पोलिस खात्यातील विविध जबाबदाऱ्या सांभाळताना मानवी तस्करी करणाऱ्यांच्या त्यांनी मुसक्‍या आवळल्या होत्या. विविध ठिकाणी कारवाया करून बालके आणि महिलांची सुटका केली होती.

लैंगिक शोषणाच्या विळख्यात अडकलेल्या महिलांची सुटका करून त्यांना चरितार्थासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना राबविल्या. बालकामगार हक्कांची पायमल्ली करून त्यांना कष्टाला जुंपणाऱ्यांवर त्यांनी कठोर कारवाई केली होती. मानवी तस्करीच्या विरोधातील मोहीम ही तेलंगणात प्राधान्य क्रमावार राहील, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या गेल्या 17 वर्षांतील या कामगिरीचा गौरव या पुरस्कारामुळे झाला आहे. 

महाराष्ट्रात विद्यार्थी म्हणून असताना अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ किंवा नर्मदा बचाव आंदोलनाशी ते संबंधित होते. इतर राज्यांत आपला नावलौकिक वाढविणाऱ्या मोजक्‍या मराठी अधिकाऱ्यांत भागवत यांचा समावेश होतो. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते अमेरिकेत उपस्थित राहू शकले नाहीत, ही मात्र टोचणी लागणारी बाब ठरली. 

संबंधित लेख