mahdev jankar in pune municpal office | Sarkarnama

कसली निवडणूक ? मी तर सहजच आलोय : जानकर 

उमेश घोंगडे 
शनिवार, 3 मार्च 2018

पुणे : पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची धावपळ सुरू असताना पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर शनिवारी महापालिकेत आल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. स्थायी समिती अध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव घेऊन आले की काय अशी विचारणा त्यांना सर्वांनीच केली. मात्र निवडणुकीशी माझा संबध नाही. आज निवडणूक आहे याची कल्पनाही नाही. मी सहजच महापालिका पाहायला आलोय, असा खुलासा खुद्द जानकर यांनीच केल्याने याविषयीची चर्चा थांबली. 

स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक असल्याने नाव दाखल करण्यासाठी सर्व इच्छुक व त्यांचे समर्थ महापालिका परिसरात दुपारपासून होते. त्यातच जानकर अचानक पोचल्याने उपस्थितांमध्ये चर्चा सुरू झाली. जानकर यांनी भाजप पक्ष कार्यालयात स्वागत करण्यात आले. चहापान घेत त्यांनी पदाधिकारी व पत्रकारांशी गप्पा मारल्या व काही वेळात पुढच्या कार्यक्रमासाठी ते निघून गेले. पुणे महापालिकेत मी याआधी कधीच आलो नाही. त्यामुळे वेळ होता म्हणून महापालिका पाहण्यासाठी सहजच आलो, असे जानकर यांनी सांगितले. जानकर यांचे एक स्वीय सहायक मुंबईतून पुण्यास येत होते. त्यांना पोचण्यास काहीसा वेळ लागणार होता. त्यामुळे त्यावेळेत जानकर यांनी महापालिकेला भेट दिली. स्वीय सहायक पुण्यात पोचताच शिरूरला जाण्यासाठी ते महापालिकेतून निघाले. 

कार्यकर्त्यांशी असलेली आपुलकी व मित्रत्वाच्या नात्यामुळे जानकर महापालिकेत आल्याचे कळताच त्यांचे अनेक कार्यकर्ते महापालिकेत पोचले. मात्र काही वेळातच ते बाहेर पडल्याने उशीरा आलेल्या कार्यकर्त्यांची जानकर यांच्याशी भेट झाली नाही. 

संबंधित लेख