आमदार राहुल कुल ठरलेत हजारो रुग्णांसाठी आरोग्यदूत

दौंडचे आमदार राहुल कुल हे पुणे जिल्ह्यात अभ्यासू आमदार म्हणून ओळखले जातात. कायद्याचे पदवीधर असलेलेकुल हे कृषी. सहकार आणि आरोग्य या क्षेत्रात प्रभावीपणे काम करत आहेत. रासपचे एकमेव आमदार असूनही त्यांनी मंत्रालयातही आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांची ही खास मुलाखत.
आमदार राहुल कुल ठरलेत हजारो रुग्णांसाठी आरोग्यदूत

मला राजकारणाची फारशी आवड नव्हती. मला राजकारणात यायचे नव्हते पण माझा राजकरणात अपघाताने प्रवेश झाला. माझे वडील सुभाषअण्णा यांचं आकस्मिक निधन झालं आणि मग मला त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर राजकारणात यावं लागलं. "दौंडचे आमदार राहुल कुल 'स्वतःच्या राजकरणात येण्याची गोष्ट सांगत होते. 

`सरकारनामा फेसबुक लाइव्ह`मध्ये दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तर दिली. `सकाळ`चे संपादक सम्राट फडणीस यांनी घेतलेल्या मुलाखतीत कुल यांनी स्वतःच्या राजकारणातील प्रवेशापासून ते मतदारसंघात आलेल्या कोट्यवधी रूपयांच्या निधीचे रहस्य काय, याची उत्तरे दिली. 

प्रश्न : तुमचा राजकारणात प्रवेश कसा झाला ?

उत्तर : माझा राजकारणात प्रवेश अपघाताने झाला. माझे वडील सुभाष अण्णा विधानसभेचे सदस्य असतानाच त्यांच आकस्मिक निधन झालं. तेव्हा कार्यकर्त्यांचा आग्रह होता मी निवडणूक लढवावी,पण माझं वय कमी असल्यामुळे माझ्या आई रंजना कुल यांनी निवडणूक लढवली. त्यानंतर नंतरच्या निवडणुकीत त्या विजयी झाल्या. माझ्या वडिलांचं निधन झाल्यामुळं आमच्या कुटुंबावर जसा दुःखाचा डोंगर कोसळला तसाचा आमच्या कुटुंबावर प्रेम करणाऱ्या लोकांवरसुद्धा पण हे सगळं सावरण्यासाठी मला आणि माझ्या आईला राजकारणात यावं लागलं. 

माझे आजोबा बाबुराव कुल सभापती होते,वडील आमदार. आमच्या घरातील तिसरी पिढी आज राजकारणात काम करतेय. आजोबा आणि वडील यांनी तालुक्यात जे कुटुंब निर्माण केलंय. त्या सगळ्या कुटुंबाच नेतृत्व करण्यासाठीच मी राजकारणात आलो आहे. त्यांचा वारसा चालवण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या आजोबानी,वडिलांनी,आईने लोकांचा जो विश्वास संपादन केलाय तोच जपण्यासाठी मी काम करतोय.

 
प्रश्न : पाणी प्रश्नाचा सखोल अभ्यास असणारा आमदार .तुमची ही ओळख कशी निर्माण झाली ?त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले ?कसा अभ्यास केला?

उत्तर : "खरतरं माझ्या वडिलांचा पाणी प्रश्नाचा अभ्यास होता,त्याच पाण्याबाबत एक धोरण होतं. ज्याकाळात मुबलक पाणी होत त्यावेळी ते म्हणायचे. पाणीटंचाई निर्माण  होईल. त्यांचं म्हणणं आज खरं झालं. मला पाण्याचा अभ्यास करण्याची प्रेरणा यांच्यामुळंच मिळाली आहे . मी ज्या तालुक्याचा आमदार आहे तो मुळात दुष्काळी तालुका आहे. ब्रिटिशांनी १८८५ साली खडकवासला धरण उभारून पूर्व भागातील लोकांचा असंतोष दूर करण्याचा प्रयत्न केला. आज पाणी आहे ते धरणामुळं आहे. पण मूळ तालुका दुष्काळी आहे. या तालुक्याचा आमदार म्हणून काम करत असताना पाण्याचा अभ्यास करणं आणि भविष्यात माझ्या भागात आणि राज्यातही पाणी टंचाई निर्माण होऊ नये म्हणून सतत जागरूक राहणं  मला गरजेचं वाटत म्हणून मी पाणी या विषयातील अभ्यास करत असतो. आज पुणे आणि आसपासची खेडी असा पाण्याबाबत वाद निर्माण होतो पण हा वाद अनाठायी आहे कारण पिंपरी  चिंचवडला मानसी १५० लिटर पाणी देऊन टंचाई नाही पण पुण्याला ३३० लिटर पाणी देऊनही टंचाई आहे,यात लोकांचा दोष नसून महानगरपालिकेचे चुकीचे नियोजन कारणीभूत आहे. 

प्रश्न : राजकारणात तुम्हाला तुमच्या वकिलीच्या पदवीचा काय उपयोग झाला ?

उत्तर : राजकारणात गेल्यावर मी अनेक गोष्टी आत्मसात केल्या. माझ्या आईचा पी ए म्हणून मी काम केलं . याकाळात मला अनेक गोष्टी जवळून समजून घेता आल्या. कायद्याचा पदवीधर असणारा मी जेव्हा कायदेमंडळाचा सदस्य झालो तेव्हा तिथल्या चौकटीत राहून प्रश्न मांडताना मला कायद्याच्या डिग्रीचा उपयोग झाला.

प्रश्न : तुम्ही आरोग्यदूत म्हणून ओळखले जाता ?तुमची जनतेत अशी ओळख कशी निर्माण झाली?

उत्तर : सामान्य, गरीब ,शेतकरी ,शेतमजूर यांच्या घरातील जर कोणी आजारी पडला तर दवाखान्यासाठी लागणारे लाखो रुपये त्यांच्याकडे नसतात, अशावेळी ते कर्जबाजारी होतात. अशा लोकांसाठी मी व माझे सहकारी यांनी धर्मादायचे दवाखाने आहेत तिथली यंत्रणा आणि पेशन्ट यांच्यातील दुवा होण्याचं काम आम्ही केलं. सरकारच्या योजना असतात पण लोकांना त्याची माहिती नसते. मग आम्ही त्या योजनांची माहिती लोकांपर्यं पोहोचवण्यासाठी कार्यरत राहिलोच पण दरवर्षी वेगवेगळ्या भागात मोफत शिबीर घेऊन तिथं १२ ते १५ हजार लोकांच्यवर उपचार करतो. मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीच्या माध्यमातून आम्ही लोकांच्यापर्यंत निधी पोहोचवण्याचं काम करत आहोत.

 
प्रश्न : तुमच्या मतदारसंघासाठी १२०० कोटी रुपयाचा निधी आण ण्यात  यशस्वी झाला आहात ?तुम्ही नेमकं हे कस साध्य केलं?

उत्तर : मी आईचा पीए  म्हणून काम केल्यामुळं मला कोणते प्रस्ताव दिले पाहिजेत आणि कसे दिले पाहिजेत हे समजलं आहे ,त्यामुळं  निधी मागताना,प्रस्ताव दाखल करताना  त्रुटी राहणार नाहीत याची काळजी मी नेहमी घेतो . आपला प्रस्ताव योग्य असेल. तो धोरणबाह्य नसेल, याची काळजी मी घेत आलो आहे .शास्त्रीय पद्धतीने प्रस्ताव दाखल करून मी माझ्या मतदारसंघासाठी ११३५ कोटी रुपयाचा निधी आणला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,पालकमंत्री गिरीश बापट यांचे नेहमीच मला सहकार्य असते. त्यांनी मला खूप सहकार्य केलं आहे .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com