Maharshtra youth leader bala bhegade in sarkarnama diwali ank interview | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

मावळात १३०० कोटींच्या विकासकामांचा धडाका : आमदार बाळा भेगडे

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

भाजपचे तरुण नेतृत्व, संघटनकौशल्यात निपुण आणि कमी वयात राजकारणात यशस्वी झालेले मावळचे (जि.पुणे) आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी आपला राजकीय प्रवास सरकारनामा फेसबुक लाइव्हमध्ये रविवारी (ता.4) उलगडला. पदापेक्षा कार्यकर्ता हे पद आपल्या दृष्टीने मोठे असल्याचे संघाच्या कुशीत घडलेल्या या तरुण नेत्याने सांगितले. पर्यटनाबरोबर उद्योगासाठी ओळखल्या जाणाऱ्या मावळमध्ये या दोन्ही क्षेत्रांना चालना देताना शेतकरी हिताकडेही लक्ष देणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले

प्रश्न : मावळ मतदारसंघात आपण उमेदवारी कशी मिळवली?

उत्तर : माझ्या वडिलांनी या भागातील गावागावात भाजपचा विचार नेला. लोक त्यांना तात्या म्हणायचे. तात्यांनी १९८०,८५,९० या साली भाजपकडून निवडणूक लढवून विधानसभेत जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याना यश मिळालं नाही. लोकांना माहिती होत आमच्या भागात भाजप जे वाढलं ते तात्यांमुळे. त्यांचा भाजप वाढीमध्ये सिंहाचा वाटा होता. म्हणून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना वाटायचं मी त्यांचं आमदार होण्याचं स्वप्न पूर्ण करावं. मला राजकारणाची आवड नव्हती. पण लोकांनी खूप आग्रह केला. लोकांच्या आग्रहाखातर मी राजकारणात आलो. पहिल्यांदा युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो. नंतर २००९ साली आणि २०१४ साली आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने मला विधानसभेत पाठवले. कसं असत स्टेशनवर जाणं सोपं असतं. पण तिथून सगळा प्रवास तुम्हालाच करावा लागतो. राजकारणात लोक ताकद देतात. पण लोकांनी दिलेल्या पाठबळाचा सन्मान राखत आपण लोकांसाठी वेळ दिला पाहिजे. त्यांची कामे केली पाहिजेत, असं मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. मी आज आमदार ते प्रेम केलेल्या कार्यकर्त्यांच्या पाठबळावर. त्यांच्या त्यागावर आणि माझ्या तात्यांनी जोडलेल्या लाखमोलाच्या माणसांमुळे!

प्रश्न :मावळातील बेरोजगारीबाबत आपल्याकडे काय उपाययोजना आहेत?

उत्तर : तरूण पिढीने नोकरीत न अडकता स्वतःच्या ताकदीवर व्यवसायात उतरावे .त्यासाठी मी माझ्या मतदार संघातील तरुणानं प्रोत्साहित करत असतो ,लागेल  ती मदत करतो . मला आर्थिकदृष्टया समर्थ झालेली युवापिढी तयार होणं महत्वाचं वाटत. त्यासाठी माझ्या मतदारसंघात प्रयत्न सुरु आहेत.

प्रश्न : पुणे जिल्हयातील लोकसभा निवडणुकीच्या बाबत आपली काय तयारी आहे?

उत्तर : ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना मला मावळ ,शिरूर आणि बारामती या तीन लोकसभा निवडणुकीतील कार्यकर्त्यांच्या सोबत सतत संपर्कात राहावे लागते. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान  म्हणून काम करण्याची संधी मिळावी म्हणून आम्ही आमच्या जिल्हयातील या जागा भाजपकडे याव्यात म्हणून प्रयत्नशील आहोत . मावळ, बारामती  आणि शिरूर मध्ये असणाऱ्या बूथप्रमुखांशी आमचा थेट संपर्क असतो. हा माणूसच आमची शक्ती आहे. त्याचा रोल खूप महत्वाचा आहे. या तिन्ही मतदारसंघात आमची ताकद वाढली आहे. याच ताकदीवर आम्ही पक्षाला चांगला निकाल देणार आहोत.

प्रश्न : भाजपचे सरकार आल्यापासून तुमच्या मतदारसंघात काय बदल झाले?

उत्तर : आमच्या विरोधकांच सरकार होत तेव्हा आम्हाला ७० कोटी निधी मिळाला होता आणि आता या सरकारकडून १३०० कोटी निधी मिळाला आहे. आमच्या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्याचं काम याकाळात झालंय. विकासकामांचा डोंगर उभा राहतोय. लोणावळा, तळेगाव येथील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. शिवाय ग्रामीण भागात आम्ही चांगलं करू शकलो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे मला माझ्या मतदारसंघात कोट्यवधींची कामे करता आली.

संबंधित लेख