maharastra police prize | Sarkarnama

सरकार पोलिसादादांचा करणार गौरव

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

मुंबई : ड्युटी संपल्यानंतरही प्रसंगी बारातासाहून अधिक वेळ घरापासून दूर राहून सेवा बजावणाऱ्या पोलिसांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न राज्याच्या गृह विभागाने केला आहे. उत्तम सेवा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आता रोख रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत. 

मुंबई : ड्युटी संपल्यानंतरही प्रसंगी बारातासाहून अधिक वेळ घरापासून दूर राहून सेवा बजावणाऱ्या पोलिसांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न राज्याच्या गृह विभागाने केला आहे. उत्तम सेवा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आता रोख रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत. 

खाकी वर्दीतील पोलिसांना नेहमीच टीकेचे धनी व्हावे लागते. पोलिस ठाण्यात एखाद्या व्यक्तीची तक्रार येते. त्यावेळी फिर्यादी आणि ज्याच्याविरोधात तक्रार आहे, त्यापैकी एकजण दुखावतो तर एक जण सुखावतो, असा आजवर प्रत्येकाचा अनुभव. पोलिसांनी कितीही उत्तम काम केले तरी, त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप होतोच. पण, अनेकवेळा आपद्‌ग्रस्त परिस्थिती निर्माण होते, त्यावेळी जनतेच्या भल्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या पोलिसांचे उल्लेखनीय काम हे जनतेच्या नजरेत येते. कर्तव्याचा भाग म्हणून प्रसंगी जीव धोक्‍यात घालतो. अशा बहाद्दर पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी गृह खात्याने रोख रकमेच्या स्वरुपात बक्षिस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 

राज्यात 25 ऑगस्ट 2017 ते 5 सप्टेंबर 2017 या कालावधीत गणेश उत्सव आणि बकरी ईदचा सण उत्सहात साजरा झाला. या सणांच्या कालावधीत राज्यातील पोलिसांनी सामाजिक एकोपा राखत कोणतीही बाधा येवू नये याची विशेष काळजी घेत चोख कामगिरी बजावली. तसेच मुंबई व परिसरात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. यावेळी अडकलेल्या मुंबईकरांना मदत करत जीवित आणि मालमत्तेचे रक्षण करण्याचे काम मुंबई पोलीस दलातील ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केले आहे. यासर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा बक्षिसे देवून गौरव करण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस दलातील पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक या गटातील कर्मचारी हे बक्षिसासाठी पात्र असतील, असे पोलीस महासंचालक कार्यालयातून सांगण्यात आले आहे. 

संबंधित लेख