पर्यटनाला रोजगाराची जोड देत विकास : जयकुमार रावल 

राजकारणाचा वारसा आणि तळागाळात वर्षानुवर्षं केलेलं काम यामुळे उत्तर महाराष्ट्रातील मातब्बर चेहरा म्हणून #युवानेतृत्वजयकुमार रावल यांचे नाव घेतले जाते...सामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री हा प्रवास रावल यांनी सरकारनामा फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून मांडला
पर्यटनाला रोजगाराची जोड देत विकास : जयकुमार रावल 

जळगाव : ''पर्यटन आणि रोजगार हमी योजना ही खरेतर दोन भिन्न खाती आहेत. दोघांमध्ये तसे साधर्म्य नाही, परस्पर पूरकताही नाही. तरीदेखील पर्यटनाला रोजगाराची जोड देऊन विकास साधण्याचा आमचा प्रयत्न आहे. पर्यटनातून रोजगार वाढून जीडीपी वाढण्यास मदत होते, तर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळ संपविण्याचा आम्ही संकल्प केला आहे," असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन विकास व रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केले. 

'सरकारनामा' फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून रावल यांनी त्यांच्या खात्याच्या माध्यमातून होणारी विविध कामे, भविष्यातील नियोजन आणि येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात विस्तृत चर्चा केली. 'सकाळ' खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक राहुल रनाळकर यांनी ही मुलाखत घेतली आणि रावल यांनी त्यांच्या दिलखुलास शैलीत 'सरकारनामा'शी संवाद साधला. 

रावल यांच्याशी झालेल्या चर्चेतील प्रश्नोत्तरे अशी - 

- पर्यटन आणि रोजगार हमी अशी दोन्ही खाती आपल्याकडे आहेत, त्या माध्यमातून आपण राज्याच्या विकासाचे कसे नियोजन केले आहे? 
रावल : पर्यटन हे महत्त्वाचे आणि विकासाचे मोठे अंग आहे. एखादा पर्यटक येतो, तर तो त्या क्षेत्रातील दहा-बारा घटकांच्या रोजगारासाठी सहाय्यभूत ठरत असतो. त्यामुळे आम्ही पर्यटन विकास विभागाच्या माध्यमातून विविध भागात पारंपरिक महोत्सवांवर भर दिला. महोत्सव म्हणजे केवळ जत्रा नसते, तर त्यात खरेदीसह रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम असले पाहिजे. राज्यातील विविध भागात वेगवेगळ्या परंपरा आहे, त्या देशभरातील पर्यटकांना माहिती व्हाव्यात म्हणून आमच्या विभागाने विशेष प्रयत्न केले. पर्यटन ही काही एका दिवसांत विकसित होणारी बाब नाही. त्यासाठी चार-पाच वर्षे सातत्याने विविध उपक्रम राबवावे लागतात, विकासाचे नियोजन करावे लागते. आपल्या राज्याला 700 किलोमीटरचा सागरी किनारा लाभलांय, तर 450 गडकिल्ले आपले वैभव आहे. त्यामुळे अशी देणगी लाभलेल्या महाराष्ट्राचा पर्यटनातून विकास व्हावा, राज्याचा जीडीपी वाढावा आणि हे राज्य समृद्ध व्हावे म्हणून पर्यटन विकास विभागाने नियोजन केले आहे. 

- रोजगार हमी योजना या खात्याच्या माध्यमातून आपण कसे काम करत आहात? 
रावल : पर्यटन व रोजगार हमी ही दोन भिन्न खाती मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे सोपवली. मात्र, ते आव्हान स्वीकारत मी या दोन्ही खात्यांमधील कामांची एकमेकांना जोड दिली. मंत्रिपदाआधी रोहयो समितीचा मी अध्यक्ष होतो, त्यात अनेक ज्येष्ठ सदस्य सोबत होते. त्यांच्या सूचना, अपेक्षा जाणून घेतल्या. ज्या महाराष्ट्रात रोहयोचा जन्म झाला, ते राज्य या योजनेच्या अंमलबजावणीत मागे कसे पडले? अन्य राज्ये पुढे कशी गेली, यासाठी आम्ही पंधरा दिवसांचा अभ्यासदौरा केला. त्यातून चांगले 'इनपुट्‌स' मिळाले, आणि त्याआधारे राज्यात काही कामे करण्याचे आम्ही निश्‍चित केले. 

त्यासाठी रोजगार हमीला आम्ही 'समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना' असे नाव दिले, आणि रोजगार हमीवर जाणाऱ्या कामगारास 'सारथी', स्वयंसेवक संबोधले. अकरा कलमी कार्यक्रम तयार करुन पहिल्या टप्प्यात 1 लाख 11 हजार विहिरींचा संकल्प केला. त्यापैकी 80 हजार विहिरी तयार झाल्या, त्यातून अडीच लाख एकर जमिनीला लाभ झाला. फळबाग लागवड योजना, अभिसरण टप्प्यातील कामे, पर्यटन विकासातील कामांमध्ये रोजगार हमीमधील स्वयंसेवकांना सामावून घेत कामे सुरु केली आहेत. केंद्राच्या मदतीने 'गाव तिथे तलाव' ही योजनाही सुरु केली आणि त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी तेथील स्वच्छता, लहान-मोठी कामे रोजगार हमीच्या माध्यमातून सुरु केली. हाताला काम, मजुरांना रोजगार मिळाला आणि किल्ल्यांची स्वच्छता त्यातून होत आहे. 

#नातंशब्दांशी #दिवाळीअंक #प्रभावीनेते #युवानेतृत्व #सरकारनामा #SarkarnamaDiwali

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com