Maharasthra Influential Leader Girish Mahajan in Sarkarnama Diwali Aan Interview | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

जलसंपदा केलं 'पाणीदार', वैद्यकीय शिक्षणातील घोडेबाजाराला लावला लगाम : गिरीश महाजन 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

जलसंपदा खात्यातील कामांच्या शंभर टक्के निविदा आघाडी सरकारच्या काळात जादा दराच्या असायच्या. आता तब्बल 88 टक्के निविदा कमी दराने जात आहेत. ही पारदर्शकता आणून हे खातंच आम्ही 'पाणीदार' केलंय.. तर वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात बड्यांची मक्तेदारी मोडीत निघाली, असे प्रतिपादन #प्रभावीनेते# राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारनामा फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून केलं.

जळगाव : "जलसंपदा खात्यातील कामांच्या शंभर टक्के निविदा आघाडी सरकारच्या काळात जादा दराच्या असायच्या. आता तब्बल 88 टक्के निविदा कमी दराने जात आहेत. ही पारदर्शकता आणून हे खातंच आम्ही 'पाणीदार' केलंय.. तर वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात बड्यांची मक्तेदारी मोडीत निघाल्याने सर्व सामान्य गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या मेरीटवर प्रवेश मिळत असून त्यातील घोडेबाजार बंद झाला, असे परखड मत राज्याचे जलसंपदाव व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी 'सरकारनामा फेसबूक लाईव्ह' मध्ये बोलताना व्यक्त केले. 

जामनेर येथे त्यांच्या निवासस्थानी ही मुलाखत घेण्यात आली. "सकाळ' खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक राहुल रनाळकर यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधाला, यावेळी महाजन यांनी त्यांचा राजकीय जीवनपट उलगडला. 

त्यांच्याशी झालेला संवाद असा - 

- राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयाबाबत काय सांगाल? 
महाजन : माझ्याकडे जलसंपदा खात्याच्या माध्यमातून महत्त्वाचे खाते आले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांसह, जनतेला, औद्यौगिक वसाहतीला पाणी द्यायचेआहे. परंतु, आपण बघितले आहे गेल्या पंधरा- वीस वर्षात या खात्याची बदनामी झाली. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आलीत. अशा स्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी माझ्यावर या खात्याची जबाबदारी दिली ते मोठे आव्हान होते आणि ते मी स्विकारले. गेल्या चार वर्षात आरोप होईल असे एकही चुकीचे काम केले नाही. 

तत्कालीन मंत्र्यावर तर शेकडो आरोप आहेत. या खात्यामार्फत आपण अनेक चांगले निर्णय घेतले मात्र पदभार घेतल्यानंतर आपण जाहीरच केले होते. एकही नवीन काम घेणार नाही. तत्कालीन सरकारने निविदाच 90 हजार कोटीच्या काढल्या होत्या. तर बजेट मात्र केवळ साडेसहा हजार कोटीचे होते. त्यामुळे कामे होणार तरी कशी हाच प्रश्‍न होता. आघाडीच्या काळात 70 हजार कोटी रूपये खर्च करून 'अजितदादा तुम्ही काय केले?' असा प्रश्‍न पृथ्वीराज चव्हाण आणि विखे- पाटील विचारत होते. कारण, एवढा खर्च होऊन एक टक्काही सिंचन झालेले नव्हते. त्या काळात निविदाच काढल्या जायच्या आणि मंत्रीच कोणाला टेंडर द्यायचे ते ठरवायचे ठराविक लोकांनाच निवीदा दिल्या जायच्या. त्यामुळे सिंचनाची कामे पूर्ण झालीच नाही, सिंचन क्षमता वाढलीच नाही.

आम्ही एकही नवीन कामे सुरू न करण्याचा निर्णय घेतला जुनी कामे आहेत तीच पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. गेल्या चार वर्षात आम्ही ही अपूर्ण कामे पूर्ण करून लोकांच्या शेतात पाणी पोहोचवित आहोत. या शिवाय जलवाहिनीतून पाणी पुरवठा करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणावर लॉसेस कमी झाले. मागच्या काळात 50 टक्के जादा दराने काम दिले गेले. आम्ही पूर्ण पारदर्शकता आणली असून सर्व अधिकार खाली दिलेले आहेत. मंत्रालयात एकही फाईल येत नाही. आमच्या काळात 88 टक्के निविदा कमी दराने दिल्यात. त्या माध्यमातून आम्ही शेकडो रूपये वाचविले आहेत. सूक्ष्म सिंचन पध्दतीचा अवलंब केला आहे. राज्यात गाळमुक्त धरण हे अभियान संपूर्ण राज्यात राबवित आहेत. राज्यातील अनेक धरणात तीस ते चाळीस टक्के गाळच आहे.त्यातील रेती काढून शासनाला उत्पन्न करून देणार आहोत. महसूल खात्याला रॉयल्टी मिळणार आहे. गाळ काढण्यामुळे स्टोरेज वाढणार आहे. उजनी व जायकवाडी धरणातील गाळ काढण्यात येणार आहे. 

तसेच वैद्यकिय शिक्षण खात्यामार्फतही लोकाभिमुख कार्य केले आहे. पूर्वीच्या शासनाच्या काळात डीम युनिर्व्हसिटी (अभिमत विद्यापीठ) काढण्यात आल्या. कॉंग्रेसच्या नेत्यांच्या संस्थांमधून एमबीबीएसच्या हजारो जागा भरल्या जायच्या. यात पैशाचा मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार व्हायचा. त्यामध्ये आता सुधारणा केल्या आहेत. तसेच आम्ही प्रत्येक जिल्ह्यात मेडीकल शासकीय मेडीकल कॉलेज काढण्याचा निर्णय घेवून जळगावला ते सुरूही केले आहे. त्यामुळे मेरीटवर आता गरीबातील गरीब मुलगाही एमबीबीएस ला प्रवेश घेवू 
शकत आहे. 

सन 2014च्या निवडणुकीच्या यशाकडे आपण कसे पाहता? 
महाजन : सन 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून केंद्रात भाजपचे वादळ आले. त्यामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला. या निवडणूकीत पक्षाला बहुमत मिळाले. देशाला प्रथमच 'मन की बात' करणारा पंतप्रधान मिळाला. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग फारसे बोलत नव्हते अर्थात त्यांची ती पद्धत होती. मात्र, मोदी हे मनातील गोष्ट जनतेला सांगतात. तर त्यानंतर राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला बहुमत मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजपची सत्ता आली आहे. आणि गेल्या पाच वर्षांपासून या दोन्ही सरकारांच्या माध्यमातून कल्याणकारी योजना, विकासाचे प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. 'अंत्योदय' या आमच्या ध्येयानुसार सरकारची धोरणे आखली जात असून तळागाळातील जनतेस त्याचा थेट लाभ होत आहे. 

#नातंशब्दांशी #दिवाळीअंक #प्रभावीनेते #युवानेतृत्व #सरकारनामा #SarkarnamaDiwali

श्री. महाजन यांच्याशी झालेली आणखी काही प्रश्नोत्तरे पुढील भागात 

संबंधित लेख