फटाकेबंदीवरून सेनेतही 'फटाके फुटणार'?

फटाकेबंदीवरून सेनेतही 'फटाके फुटणार'?

मुंबई : राज्य सरकारने फटाक्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न चालवला असल्याचे लक्षात येताच शिवेसना खासदार संजय राऊत यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे पर्यावरण मंत्री रामदास कदम विरूध्द खासदार संजय राऊत असा सेना नेत्यांचा सामना पहायला मिळणार आहे.

राज्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना प्रदुषणमुक्त दिवाळीची शपथ देण्यात आली आहे. मंत्रालय परिसरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पर्यावरणमंत्री रामदास कदम, पर्यावरण विभागाचे अप्पर सचिव डाॅ.सतिश गवई यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. यावेळी बोलताना पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले, ''राज्यातही फटकेबंदीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन फटाकेविक्री याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.''

या निर्णयाला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेत म्हणाले, ''फटाक्यांवर अनेकांचा रोजगार अवलंबून आहे आणि फक्त भारतातच नाही तर जगात फटाके आहेत. त्यामुळे फटाकेविक्री बंद करु नये.'' त्यामुळे शिवसेनेचे मंत्री असलेले रामदास कदम आणि संजय राऊत यांच्यात फटाकेबंदीवरुन मतभेद असल्याचे समोर आले आहे. आता यात रामदास कदम पक्षाच्या बाजूने उभे राहतात की आपला पक्ष ज्यावर सतत टीका करतो त्या राज्य सरकारच्या बाजूने हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com