भारतीय वनसेवा परीक्षेत महाराष्ट्राचा निरंजन दिवाकर देशात तिसरा तर सुमीत पाटील सातवा

भारतीय वनसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून एकूण ११० उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यात महाराष्ट्रातील १४ उमेदवारांचा समावेश आहे.
भारतीय वनसेवा परीक्षेत महाराष्ट्राचा निरंजन दिवाकर देशात तिसरा तर सुमीत पाटील सातवा

नवी दिल्ली  : भारतीय वनसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून एकूण ११० उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यात महाराष्ट्रातील १४ उमेदवारांचा समावेश आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेच्या आधारावर फेब्रुवारी २०१८ मध्ये या उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. यासंदर्भातील निकाल सोमवारी जाहीर झाला आहे. यानुसार देशभरातून एकूण ११० उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यात महाराष्ट्रातील १४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

निरंजन दिवाकर गुणवत्ता यादीत तिसरा

गुणवत्ता यादीत पहिल्या १० मध्ये महाराष्ट्रातील २ उमेदवारांचा समावेश असून निरंजन सुभाषराव दिवाकर तिस-या तर सुमीतकुमार सुभाषराव पाटील ७ व्या स्थानावर आहे. याशिवाय काजोल पाटील (११), श्रीनिवास विनायकराव पाटील (२८), संदीप हिंदुराव सुर्यवंशी (३८),निखील दशरथ थावळ (४६), सुदर्शन गोपीनाथ जाधव (४७), कस्तुरी प्रशांत सुळे (५६), राहुल किसन जाधव (६८), प्रशांत बाजीराव पाटील (६९), अमील लक्ष्मण शिंदे (७३), सतीश अशोक गोंधळी (७९), अक्षय बाळू भोरडे (९५), शंशाक सुधीर माने (१००) आणि  राहुल गजबिये (१०२) यांचा समावेश आहे.

एकूण उत्तीर्णांमध्ये ४६ उमेदवार खुल्या प्रवर्गातील, ४० इतर मागास वर्गीय, १६ अनुसूचित जाती तर ८ अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. यातील ३ उमेदवार हे दिव्यांग आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com