Maharashtra river water taken by Gujarat Girish Mahajan keeps mum | Sarkarnama

महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी चालले  गुजरातला ; गिरीष महाजन म्हणतात आताच काही सांगता येत नाही !

संपत देवगिरे  :  सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 19 जुलै 2017

नाशिक   :   पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडविण्याबाबात महाराष्ट्र- गुजरात व केंद्र शासन यांच्यातील चर्चा अंतिम टप्प्यात आहे. महिन्याभरात आराखडा तयार होईल. त्यासाठीचा पंधरा हजार कोटींचा खर्च केंद्र शासन करील. अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. मात्र यावेळी महाराष्ट्राच्या वाट्याचे सर्व पाणी मिळणार का याबाबत मात्र त्यांनी मौन बाळगले. त्यामुळे महाराष्ट्र- गुजरात पाणी वाटपाविषयी त्यांनी "नरो वा कुंजरो वा !' भूमिका घेतली. 

महाराष्ट्रातील पश्‍चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी अडविण्याचा प्रश्‍न तीव्र बनला आहे. 2010 मध्ये तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात हा करार झाला होता. त्यावरुन गेले सात वर्षे राजकारण तापले आहे. विशेषतः गोदावरी आणि गिरणा खोऱ्यात तूट आहे. नारपार, गिरणा प्रकल्पांसह विविध भागावर त्याचा परिणाम होईल. त्यामुळे नाशिकसह मराठवाड्यातील नेत्यांत वाद सुरु आहे.

 पश्‍चिमवाहिनी नद्यांचे गुजरातला जाणारे पाणी अडवून त्याचा वापर नाशिक व मराटवाड्यातील दुष्काळी तालुक्‍यांना करण्याचे नियोजन आहे. मात्र किती पाणी यावरुन वाद सुरु आहे. त्याचा डिटेल  प्रोजेक्ट रिपोर्ट - सविस्तर प्रकल्प अहवाल  (डीपीआर ) तयार करतांना त्यात चुकीची माहिती देऊन महाराष्ट्राला वंचित ठेवण्याची तक्रार आहे.

आता हा डिपीआर तयार होतांना किती पाणी मिळणार याबाबत मात्र मंत्री महाजनांनी मौन बाळगले. "किती पाणी मिळेल हे आत्ता सांगता येणार नाही. त्याच्या वादात न जाता केंद्र शासन पैसे देणार आहे. त्याला महत्व द्यावे'' असे त्यांनी सांगीतल्याने आगामी काळात पश्‍चिवाहिनी नद्यांच्या पाण्यावरुन राज्यात नवे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. 

जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आज झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात आमदार जे. पी. गावित (कळवण), आमदार निर्मला गावित (ईगतपूरी), नरहरी झीरवाळ (दिंडोरी) या आमदारांनी येथील भौगोलीक स्थिती डोंगराळ, जास्त पावसाची आहे. येथे जलयुक्त शिवार योजनेचा उपयोग नाही. त्यातून परिसराचे प्रश्‍न सुटत नाहीत. तीव्र बनलेत. पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी या भागासाठी महत्वाचे आहे यावर भर दिला.

त्यामुळे ही बैठक पाण्याच्या प्रश्‍नावरुन गाजली. त्यात राज्यातील पाच धरणांतील गाळ काढण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मंत्री महाजन म्हणाले. यांमध्ये गुजरातला जाणारे राज्याच्या वाट्याचे पाणी अडवणार केव्हा व किती पाणी अडवणार? हा प्रश्‍न अधांतरीच राहीला. 
 
संबंधित लेख