Maharashtra Politics Vikhe Teases Shivsena | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

पुन्हा लाथा घाला म्हणजे, पैसे खात्यात जमा होतील - विखे पाटील

ब्रह्मा चट्टे
मंगळवार, 25 जुलै 2017

स्वामीनाथन  आयोगाच्या शिफारशी केव्हा झाला. कर्जमाफीच्या घोषणामुळे सरकारचे वर्तमान बदलले, भविष्य देखील बिघडले. ३४ हजार कोटींचा आकडा कसा काय दिला ? मग २० हजार कोटींचा आकडा कसा काय दिला. अजब सरकारचा गजब कारभार आहे- राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई : सामनामध्ये शिवसेनेने लाथा घातल्या म्हणुन कर्जमाफी दिली असा अग्रलेख लिहला होता. आता पुन्हा लाथा घाला म्हणजे, पैसे खात्यात जमा होतील, असा चिमटा शिवसेनेला काढत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्जमाफीवरून सरकारवर टीकेची झोड उठवली. विधानसभेत नियम 293 अन्वये सत्ताधारी पक्षांनी मांडलेल्या प्रस्तावावर विखे पाटील बोलत होतो.

विखे पाटील म्हणाले, ''स्वामीनाथन  आयोगाच्या शिफारशी केव्हा झाला. कर्जमाफीच्या घोषणामुळे सरकारचे वर्तमान बदलले, भविष्य देखील बिघडले. ३४ हजार कोटींचा आकडा कसा काय दिला ? मग २० हजार कोटींचा आकडा कसा काय दिला. अजब सरकारचा गजब कारभार आहे. २०१७ चे कर्ज फेडल्याशिवाय कर्जमाफी देणार नाही, याचा कोणाला फायदा मिळेल हे सांगा. वधू पाहायला जायचं आणि पाळणा देऊन जायचे, असा कारभार सुरू असल्याचे सांगत संघर्ष यात्रेच्या निमित्ताने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास मिळाला असल्याचा दावा विखे पाटील यांनी केला.

विधीमंडळातील अन्य बातम्यांसाठी क्लिक करा :

हाऊस कोण चालवतयं ? तुम्ही का अध्यक्ष? : दिलीप वळसे-पाटील

विधानसभेत खडसेंच्या मदतीला विरोधक आले धावून

पुरोहित, तुला शेतीतलं काय कळतं का?

घोटाळ्यावरील प्रश्नांना सभागृहात बंदी

संबंधित लेख