मंत्रिपद आणि 'रामभक्त' चंद्रकांतदादा

एकनाथ खडसे यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर महाजन आणि खडसे यांचा वाद वाढू नये म्हणून पाटील यांना जळगावचे पालकमंत्रिपद देण्यात आले होते. त्यावेळी पाटील जळगावात कार्यकर्त्यांना उद्येशून म्हणाले होते, मी महसूलमंत्री असलो तरी भरताप्रमाणेच खडसेंच्या पादुका खुर्चीवर ठेवून काम करीत आहे, त्यांना त्यांचे मंत्रिपद पुन्हा परत करीन. आता हेच मंत्रिपद ते राणेंना द्यायला निघालेत. परंतु, अगोदरच्या 'रामा'चे काय असा सवाल खडसे समर्थकांना पडला नसता तरच नवल..? राणेंना मंत्रिपद द्यायला निघालेले चंद्रकांत पाटील 'भरत' आहेत, मात्र वर्षभराआधीच त्यांनी त्यांचा 'राम' मात्र बदलला...
मंत्रिपद आणि 'रामभक्त' चंद्रकांतदादा

जळगाव : राज्यात भाजप निवडणुकीत यश मिळवून जोर करीत आहे, जळगावातही पक्षाने निवडणुकीत यश मिळविले असले तरी पक्षांतर्गत नेत्यांचे वाद सुरू असून पक्षात फारसे आलबेल नाही. ही बाब आता प्रदेशस्तरावरील नेत्यांनाही माहीत आहे. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्यानंतर जिल्ह्यातील कॅबीनेट मंत्री असलेल्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्रिपद येणे अपेक्षित होते. मात्र, पक्षाने दोन्ही नेत्यामधील अंतर्गत वाद लक्षात घेऊन अगोदर कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले आहे.

पालकमंत्री म्हणून या वर्षाच्या जानेवारीत चंद्रकांत पाटील पहिल्यांदा जळगावात आले होते. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांना उेद्‌शून म्हणाले होते, ''आपण महसूल मंत्री असलो तरी भरताप्रमाणेच आहोत आपण खडसेंच्या पादुका ठेवून सेवक म्हणून महसूलखाते सांभाळत आहोत. त्यांचा मंत्रिमंडळात सामावेश झाल्यानंतर आपण त्या पदापासून दूर होणार आहोत.'' पाटील यांनी खडसे समर्थक भाजप कार्यकर्त्यांना आश्‍वासित केल्यानुसार कार्यकर्ते अधिकच उल्हासित झाले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून पाटील यांनी जळगावात कार्य केल्यामुळे त्यांचा जळगाव जिल्ह्यात कार्यकर्त्यांशी चांगला परिेचय आहे. सद्यस्थितीत पाटील हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या अत्यंत जवळचे मानले जात असल्यामुळे त्यांच्या शब्दाला मान असल्याचा कार्यकर्त्यांचा ठाम विश्‍वास आहे. त्यामुळे पाटील यांच्या बोलण्यात दम असल्याचे खडसे समर्थकांना वाटत होते. हे कार्यकर्ते नाथाभाऊंच्या मंत्रिमंडळातील पुर्नप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.

परंतु, आता चंद्रकांत पाटलांनी त्याच महसूलमंत्रीपदाबाबत नवीन वक्‍तव्य केल्याने जळगाव जिल्ह्यातील खडसे समर्थक भाजप कार्यकर्ते बुचकाळ्यात पडले आहेत. काँग्रेसचे 'नारायण' भाजप मध्ये प्रवेश करण्याची शक्‍यता आहे. त्यांना पक्षनेतृत्वाने कोणतेही मंत्रिपद देण्याबाबत घोषणा केलेली नाही. परंतु ,चंद्रकांत पाटील यांनी त्यांना बांधकाम खाते देण्याचीही तयारी दर्शविली. मात्र महसूल मंत्रीपदावर खडसेंच्या पादुका ठेवून ते कार्य करीत होते, मग रामभक्त चंद्रकात पाटील यांनी खडसेंच्या पादुका बाजूला करून ते आसन राणेंना देण्याचा निर्णय कसा घेतला. मग, खडसेंचे काय आणि रामभक्त 'भरता'चे काय? असा सवाल आता निर्माण झाला आहे.

राणेंसाठी मंत्रिमंडळातील पद सोडण्याची घोषणा म्हणजे ते पद कायम करण्याची ही खेळी आहे, अशी चर्चाही आता सुरू आहे. परंतु, त्यांना ओळखणाऱ्या जळगावच्या कार्यकर्त्यांनी यावरुन 'दादा आप तो ऐसे ना थे....मगर अफसोस कार्यकर्ता और पॉलिटीशियन मे फरक होता है', असे म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com