Maharashtra Politics : Pruthviraj chavan talks with press | Sarkarnama

पहिले वर्ष विरोधक म्हणून काय काम करायचे हे कळतच नव्हते - पृथ्वीराज चव्हाण

गोविंद तुपे :  सरकारनामा ब्युरो
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

मुंबई :  " सत्ता गेल्यानंतर पहिले एक वर्ष कळतच नव्हते की विरोधक म्हणून काय काम करायचे असते. त्यामुळे मागील काळात आम्ही आक्रमक नव्हतो. परंतू यापुढे सरकारची कोंडी करणार आहोत हे मात्र नक्की आहे , "असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार  परिषदेत एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले . 

गेल्या काही दिवसापासून तुम्ही विधानसभेत आक्रमक झाले आहात नक्की काय कारण आहे.  या प्रश्नाला उत्तर देताना श्री . चव्हाण यांनी बोलत होते . 

विरोधी पक्ष नेते भाजपच्या वाटेवर आहेत. त्याच बरोबर पक्षातही मतमतांतर असल्याने सभागृहात मेळ नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद पदरात पाढून घेण्यासाठी आपण आक्रमक झाले आहात का?

या प्रश्नांवर खुलासा करताना चव्हाण म्हणाले की ,

" माझ्या पक्षश्रेष्ठींवर विश्वास आहे. माझ्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणूकीत मिळालेल्या अपयशाची जबाबदारी मी स्वतः घेतली आहे. त्याचबरोबर सर्वच पदे मला मिळावी यासाठी माझा कधीही आग्रह राहिला नाही. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी विरोधी पक्ष नेत्याची निवड केली आहे, त्या प्रक्रियेत मी सुध्दा होतो. त्यामुळे मी पदासाठी किंवा पोकळी भरून काढण्यासाठी आक्रमक झालो नाही . " 

संबंधित लेख