Maharashtra Politics Nitesh Rane on Maratha morcha | Sarkarnama

मराठा क्रांती मोर्चाला सोईसुविधा द्या ; खर्च मी देतो - आमदार नितेश राणे 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

मुंबई   : मराठा क्रांती मूक मोर्चात सहभाग घेण्यासाठी मराठा आमदार सरसावले असतानाच आमदार नितेश राणे यांनी मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र लिहले आहे.

मराठा क्रांती मोर्चासाठी आवश्यक पाणी आणि स्वच्छतेच्या सुविधा पुरवा त्याचा खर्च भरायला मी तयार असल्याचे नितेश राणे यांनी पत्रात लिहले आहे.

नितेश राणे यांनी अजोय मेहता यांना  लिहलेल्या पत्रात ते म्हणतात, " मराठा क्रांती मूक मोर्चाचे येत्या बुधवारी 9 आँगस्ट रोजी मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. जिजामाता उद्याने ते आझाद मैदान असा मोर्चाचा मार्ग असून या मोर्चात राज्यातील 70 ते 80 लाख समाजबांधव सहभागी होणार आहेत. "

"त्या मोर्चात सहभागी होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाेकरांसाठी पिण्याचे पाण्याची तसेच फिरत्या शौच्छालयाची व्यवस्था करण्यात यावी, या सोयी सुविधेसाठी लागणारा सर्व खर्च मी महापालिकेला देण्यास तयार आहे."

संबंधित लेख