Maharashtra Politics Mumbai Floods Ashis Shelar | Sarkarnama

नालेसफाई झाल्याचा 'ढेकर' तर दिलात...प्रत्यक्षात काय?

सरकारानामा ब्युरो
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

मंगळवारी मुंबईत पडलेल्या पावसामुळे या निसर्गाच्या मर्यादा कि सत्ताधाऱ्यांच्या मर्यादा?, हे ही करदात्याला कळून येईल - आशिष शेलार

मुंबई : मुंबईतल्या पूरग्रस्त परिस्थितीबाबत उध्दट भाषा बोलण्यापेक्षा ज्या प्रवाशांचे हाल झाले.. संसार उघड्यावर आले..त्या मुंबईकरांची  माफी मागावी आणि चुका दुरुस्त करायला लागावे, असा टोला मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेचे  नाव न घेता लगावला आहे.    

पुराचे पाणी ज्यांच्या घरात घुसून नुकसान झाले. तसेच घरे सोडावी लागली अशा मुंबईकरांना महापालिकेने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी  आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच मंगळवारी मुंबईत पडलेल्या पावसामुळे या निसर्गाच्या मर्यादा कि सत्ताधाऱ्यांच्या मर्यादा?, हे ही करदात्याला कळून येईल असे शेलार म्हणाले.                 

प्रख्यात  डाॅ. अमरापूरकर कुठे गायब झाले? याचे उत्तर देणार का? असे सवाल त्यांनी केला आहे. नालेसफाई झाली असा 'ढेकर' ज्यांनी दिला, फोटो काढले. पण आता ज्यांच्या घरात पाणी शिरून संसार उध्वस्त झाले..त्यांचे काय ते करणार? पालिकेच्या खुर्च्यांमधील सत्ताधीश कुठे लपुन बसले होते? या उलट भाजपचे आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारी रस्त्यावर उतरून लोकांसाठी झटत होते, अशी टीका  शिवसेनेचे नाव न घेता शेलार यांनी  केली.

संबंधित लेख