Maharashtra Politics Bawankule | Sarkarnama

शिवसेनेच्या आमदारांसाठी भाजपचे मंत्री उदार

तुषार खरात
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

आम्ही सत्तेत सहभागी असतानाही भाजपचे मंत्री केवळ त्यांच्याच आमदारांची कामे मंजूर करतात. शिवसेनेच्या आमदारांची कामे ते मंजूर करीत नाहीत, अशी तक्रार गेल्या अधिवेशनादरम्यान सेनेच्या सर्व आमदारांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. ठाकरे यांनी तेथूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

 

करमाळ्यातील सेना आमदारांच्या 6 कोटींच्या कामांना मंत्री बावनकुळे यांच्याकडून मंजुरी

मुंबई : भाजपचे मंत्री शिवसेनेच्या आमदारांची कामे मंजूर करीत नाहीत, याबाबत शिवसेनेने सतत तक्रारी केल्याचा परिणाम दिसू लागला आहे. भाजपचे मंत्री आता थोड्या प्रमाणात का होईना शिवसेनेच्या आमदारांची कामे मंजूर करू लागले आहेत. याचा सुखद अनुभव करमाळ्याचे शिवसेना आमदार नारायण पाटील यांना आला आहे. भाजपचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाटील यांच्या मतदार संघातील विविध वीज समस्या सोडविण्यासाठी 5.90 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

आम्ही सत्तेत सहभागी असतानाही भाजपचे मंत्री केवळ त्यांच्याच आमदारांची कामे मंजूर करतात. शिवसेनेच्या आमदारांची कामे ते मंजूर करीत नाहीत, अशी तक्रार गेल्या अधिवेशनादरम्यान सेनेच्या सर्व आमदारांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. ठाकरे यांनी तेथूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. एवढेच नाही तर एकनाथ शिंदे, रामदास कदम यांच्यासह सेना मंत्री – आमदारांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत तक्रार सुद्धा केली होती. त्यानंतर आता थोडा फरक पडला असून भाजपचे मंत्री सेनेच्या आमदारांची कामे मंजूर करू लागले आहेत.

आमदार नारायण पाटील यांनी बावनकुळे यांची भेट घेऊन विज समस्या सोडविण्यासाठी निधी मंजूर करण्याची विनंती केली होती. त्यानुसार करमाळा शहरासाठी 1.75 कोटी, कुर्डूवाडीसाठी 1.37 कोटी, करमाळा मतदारसंघातील 154 गावांसाठी 1.64 कोटी, जिल्हा योजनेतून स्वतंत्रपणे 154 गावांसाठी 1.15 कोटी रुपये मंजूर केल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित लेख