Maharashtra politics Bapat bats in Baramati | Sarkarnama

बारामतीत बापटांची बॅटिंग !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

बारामती  :  अजित पवार व गिरीश बापट व्यासपीठावर आले आणि त्यांच्यात जुगलबंदी झाली नाही असे घडतच नाही. 
आज बारामतीत झालेल्या  कार्यक्रमा दरम्यानही गिरीश बापट यांनी जोरदार फटकेबाजी केली. गिरीश बापट यांच्या अगोदर अजित पवार बोलल्याने त्यांना बापटांना उत्तर देण्याची मात्र संधी मिळाली नाही. 

बारामती  :  अजित पवार व गिरीश बापट व्यासपीठावर आले आणि त्यांच्यात जुगलबंदी झाली नाही असे घडतच नाही. 
आज बारामतीत झालेल्या  कार्यक्रमा दरम्यानही गिरीश बापट यांनी जोरदार फटकेबाजी केली. गिरीश बापट यांच्या अगोदर अजित पवार बोलल्याने त्यांना बापटांना उत्तर देण्याची मात्र संधी मिळाली नाही. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 292 व्या पुण्यतिथीनिममित्त बारामतीत आयोजित कार्यक्रमास  रामराजे निंबाळकर, राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे, प्रकाश शेंडगे, आर.जे. रुपनवर, रामराव वडकुते, बाळासाहेब गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

" बापटांनी नानाला (विश्वास देवकाते) दम दिला आहे की प्रोटोकॉलप्रमाणे मी दादांनंतर बोलणार, त्या मुळे मीच आपले अगोदर भाषणाला उठलो", असे अजित पवार यांनी सुरवातीलाच सांगत भाषणाची सुरवात केली. मात्र त्यांनी बापटांना फार चिमटे काही  काढले नाहीत.

बापटांनी मात्र नंतर संधी मिळाल्याने बॅटींग केली. ते म्हणाले ," नानाची माझी जुनी दोस्ती. त्याने कार्यक्रमाला बोलावल्यावर मी हो म्हटल पण नंतर त्याने हळूच सांगितल की अजितदादाही येणार आहेत म्हणून.पण आम्हाला चालतय, कारण आम्ही राजकीय अस्पृश्यता मानत नाही. विचारांची लढाई असू शकते पण आम्ही विकासकामात एकत्र असतो. "

" नाना मोठा हुशार आहे तो बारामतीत आला की दादांचा असतो आणि पुण्यात माझा. पण नाना तुमच काम चांगल चाललय, त्या मुळे तुम्ही आहे तिथच नीट राहा, इकडेतिकडे जाऊ नका....(हशा...) हो , अहो आमच्याकडेच इतकी गर्दी झाली आहे की आता आणखी कोणा कोणाला घेऊ हेच समजेनासे झालेय!  आणि कोणी सांगावे तुम्ही इथे राहिला तर पुढे जाऊन आमदार देखील व्हाल."

यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या , "अहो अजितदादांकडे बघा ना....!" त्यावर हसत गिरीश बापट म्हणाले, "ताई घाबरु नका मी विधानपरिषदेच बोलतोय आणि तुमच्या भावाच सगळ योग्यच होणार आहे.पण दादा मी मात्र तुम्हाला एक सांगतो , 'तुम्ही ते माझी सटकते' हे काही म्हणता ना ते मात्र मला काही कळत नाही.मात्र तरीही आम्ही दोघे चांगले मित्र आहोत आणि आम्ही एकमेकांच्या कार्यक्रमांना जातो .आमचे काही भांडण नाही, अशी हसत हसत पुस्तीही त्यांनी जोडली. 

बापटांच्या या बॅटींगचीच नंतर बारामतीत जोरदार चर्चा होती. 

--------------------------------

 धनगर समाजाने आपले उपद्रवमूल्य वाढवायला हवे - राजशिष्टाचार मंत्री  राम शिंदे  http://www.sarkarnama.in/minister-ram-shinde-baramati-politics-13558

संबंधित लेख