Maharashtra Political News Washim District Tur | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

शेतकऱ्यासाठी शासन ठरले नादार! : तुरीचा धनादेश 'बाऊन्स'

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

प्रकरणाची चौकशी करू : भाकरे तुरीच्या खरेदीचे पैसे उपलब्ध झाल्यानंतरच शेतकऱ्यांना धनादेश देण्यात येतो. मात्र, धनादेश दिल्यानंतर खात्यात पैसे नसणे व धनादेश 'बाऊन्स' होणे ही गंभीर बाब असून याची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया नाफेडचे व्यवस

वाशीम : खुल्या बाजारात भाव नसल्याने नाफेडला तूर विकली. मुलीचे लग्न तोंडावर आले असतानाही दमडीही मिळाली नाही. मात्र, नंतर मिळणाऱ्या धनादेशावर लग्नाचे कर्ज फेडून चरितार्थ चालविण्याचे स्वप्न रंगविणाऱ्या कोंडाळा झामरे येथील शेतकरी महादेव सिताराम बुंदे या शेतकऱ्याचे स्वप्न उध्वस्त झाले आहे. तूरीपोटी मिळालेला धनादेश 'बाऊन्स' झाल्याने या शेतकऱ्यासाठी शासन नादार झाले आहे. अशा गंभीर प्रकरणानंतर शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

बाजारपेठेत घाम गाळून पिकविलेल्या तुरीला भाव नसल्याने कोंडाळा झामरे येथील शेतकरी महादेव सिताराम बुंदे या शेतकऱ्याने 3 जून 2017 रोजी शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजने अंतर्गत 24 क्विंटल तूर विकली होती. मात्र, या तूरीचे पैसे लवकर मिळत नाहीत, हे समजल्यानंतर या शेतकऱ्याच्या पायाखालची जमिन सरकली. कारण तुरीच्या भरवशावरच मुलीचे लग्न जुळविले होते. लग्नाची तारिख पक्की झाल्यानंतर तुरीचे पैसे मिळत नसल्याने उसनवार करून या शेतकऱ्याने लग्न उरकले. मात्र, तब्बल दोन महिन्यानंतर या शेतकऱ्याला तुरीच्या विक्री पोटी शासनाने सेन्ट्रल बॅंकेच्या अनसिंग शाखेचा एक लाख 19 हजार 988 रूपयांचा धनादेश 'नाफेड'च्यावतीने  देण्य़ाता आला. हा धनादेश या शेतकऱ्याला 13 ऑगस्टला मिळाल्यानंतर त्याने तो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वाशीम शाखेतील आपल्या खात्यात भरला.

मात्र, या शेतकऱ्याची येथे घोर निराशा झाली. हा धनादेश बॅंकेत भरल्यानंतर बॅंकेने सोमवारी (ता. 28) नाफेडच्या खात्यात ऐवढे पैसेच नसल्याने धनादेश अनादरीत झाल्याची सुचना शेतकऱ्याला केली. व सुचना पत्रासह तो धनादेश या शेतकऱ्याला परत देण्यात आला आहे.

तूरही गेली अन्‌ पैसेही गायब!
मुलीच्या लग्नाचे कर्ज तूरीवर देऊ या बोलीवर या शेतकऱ्याने उसनवार करून मुलीचे लग्न उरकले. मात्र, आता नाफेडने तूरी खरेदी केल्या. धनादेशही दिला. मात्र, तो धनादेश 'बाऊन्स' झाल्याने आता या शेतकऱ्यासमोर गंभीर संकट उभे राहिले आहे.

कारंजाची पुनरावृत्ती
कारंजा केंद्रावरून शेतकऱ्यांच्या खरेदी केलेल्या तुरीपोटी कारंजा खरेदीविक्री संस्थेला शासनाकडून चुकाऱ्यासाठी 30 लाख रूपये देण्यात आले होते. मात्र, ही रक्कम खरेदी विक्री ने अंतर्गत बाबीसाठी खर्च केल्याची गंभीर बाब घडली होती. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधकांनी तत्काळ कारवाईचा इशारा दिल्यानंतर ही रक्कम खरेदी-विक्रीने परत केली होती. तसलाच प्रकार पुन्हा घडल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित लेख