Maharashtra Political News Vikhe Patil in a fix | Sarkarnama

विखेंची कोंडी : भाजपला स्मरावे, की काँग्रेसलाच तारावे

मुरलीधर कराळे
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

नारायण राणे यांनी काँगेसला 'बाय-बाय' केल्यानंतर काँग्रेसमधील विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे. विधानसभेत काँगेसचे संख्याबळ कमी होणार असल्याने या पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार दावा करणार आहेत. भारतीय जनता पक्षात लगेच जाऊन विखे यांना विशेष फायदा होणार नाही. आणि काँगेसमध्ये राहून काँग्रेससजनांच्या नाराजीमध्ये ते रमणार नाहीत. अशी द्विधा मनःस्थिती असल्याने त्यांच्या भूमिकेवर जिल्ह्यातील आगामी राजकीय घडामोडी अवलंबून आहेत.

नगर : नारायण राणे यांनी काँगेसला 'बाय-बाय' केल्यानंतर काँग्रेसमधील विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे. विधानसभेत काँगेसचे संख्याबळ कमी होणार असल्याने या पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार दावा करणार आहेत. भारतीय जनता पक्षात लगेच जाऊन विखे यांना विशेष फायदा होणार नाही. आणि काँगेसमध्ये राहून काँग्रेससजनांच्या नाराजीमध्ये ते रमणार नाहीत. अशी द्विधा मनःस्थिती असल्याने त्यांच्या भूमिकेवर जिल्ह्यातील आगामी राजकीय घडामोडी अवलंबून आहेत. त्यामुळे भाजपला स्मरावे की आधीच डबघाईला आलेल्या काँग्रेसला तारावे, अशा कोंडीत ते सापडले आहेत.

विधानसभेत सध्या काॅग्रेसचे ४२, तर राष्ट्रवादी काॅग्रेसचे ४१ आमदार आहेत. केवळ एक सदस्य जास्त असल्याने विरोधी पक्षनेतेपद काॅंग्रेसला गेले. नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने आगामी काळात राणे यांचे पूत्र आमदार नितेश राणे व  समर्थक कालिदास कोळंबकर हेदेखील वडिलांनी स्थापन केलेल्या पक्षात जातील. साहजिकच कमी संख्याबळामुळे राष्ट्रवादीचे पारडे जड होईल. साहजिकच विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीकडे जाईल. अर्थात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.असे झाल्यास विखे पाटील यांना विरोधी पक्षनेतेपदाला मुकावे लागणार आहे.

आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. असे झाल्यास विखे पाटील यांना विरोधीपक्षनेतेपदाला मुकावे लागणार आहे.

काँग्रेसची घरघर संपेना
नगर जिल्ह्यात काँगेस म्हटले, की विखे पाटील यांचेच नाव पुढे येते. राज्य आणि देशपातळीवर चमकेल, अशा नेतृत्त्वाची पक्षात वानवा आहे. त्यात विखे पाटील यांची मुख्यमंत्र्यांशी असलेली सलगी काँगेसला अधिकच अडचणीत टाकीत आहे. दुसऱे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे राज्यपातळीवर कार्यकतृत्त्व असले, तरी ते आपला गड सोडून सहसा विरोधकांना डिवचताना दिसत नाहीत. आता गुजरात राज्यातील विधानसभा निवडीची जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे. आपला गड सोडून त्यांना गुजरातकडे लक्ष द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसला खास वाली कोण, अशी अवस्था झाली आहे.

काँग्रेसमधील पदाधिकारी निवडीही रखडल्या आहेत. बहुतेक कार्यकर्ते या पक्षात येण्यास फार उत्सुक नाहीत. मोदी लाटेत काँग्रेसची धूळदाण होऊ पाहत असताना वरिष्ठ नेते गटबाजीत अडकले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते दिशाहीन झाले आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसला तारणारा मसिहा मिळण्याची गरज आहे.

भाजपमध्ये काय साध्य होणार
विखे पाटील यांनी भाजपची वाट धरल्यास त्यांना तेथे काय साध्य होणार, हा प्रश्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मैत्री असली, तरी विरोधी पक्षनेत्यांचा उपद्रव नको म्हणून ही मैत्री मुख्यमंत्र्यांनीच घट्ट केल्याची चर्चा आहे. आता विरोधीपक्षनेतेपद गेल्यास विखे एकटे पडतील. मग मुख्यमंत्री त्यांना जवळ करतील काय, अशा प्रश्न आहे. जवळ केलेच, तर भाजपमधील इतर नेते त्यांना कसे स्विकारतात, हे काळ ठरविणार आहे. त्यामुळे विखेंना तूर्ततरी भाजपमध्ये जाऊन विशेष काहीच पदरात पडणार नाही. फक्त नगर जिल्ह्यात काँग्रेस खिळखिळी करण्याचा भाजपचा डाव यशस्वी होईल एव्हढेच.

काँग्रेसचे मसिहा शक्य
या सर्व परिस्थितीत विखे पाटील यांनी मनावर घेतले, तर काँग्रेसचा नगर जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील चेहरा बदलण्याची ताकद त्यांच्यात आहे. मात्र त्यांचे मन काँग्रेसमध्ये रमताना दिसत नाही, हे अनेक घटनांवरून दिसून आले आहे. काँग्रेसमध्ये राहून ते नगर जिल्ह्याचा मसिहा होऊ शकतात. स्वतःचे नेटवर्क, राजकीय घराण्याची असलेली परंपरा, जिल्ह्यात त्यांना मानणारा वर्ग पाहता ते काँग्रसला तारू शकतात. काँग्रेसमध्येच राहून राज्यपातळीवरील मोठ्या पदावर आपले स्थान बळकट करू शकतात. सध्या सुरू असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रसमध्येच राहणार असल्याचा बाॅम्ब टाकल्यास अनेक ग्रामपंचायती काँगेसकडे येऊ शकतील, हे मात्र निश्चित.

 

संबंधित लेख