Maharashtra Political News Supriya Sule Yatra Aurangabad | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

सुप्रिया ताई बोलल्या, युवतींना भावल्या

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात भ्रृणहत्या मोठ्या प्रमाणात होत होती. या विरोधात आम्ही आवाज उठवित महाराष्ट्रभर जनजागृती सुरू केली. आज परिस्थिती बदलली आहे. लोकांचे विचार बदलले आहेत. आता मुलींमध्येच जागृती होऊन भृणहत्येला आळा बसू लागला आहे. मात्र, राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. विद्यार्थ्यांमध्येही हवं तसं यश न मिळाल्याने आत्महत्या करण्याचे प्रकार होत आहेत. यासाठी आपणच सजग व्हावे. समाजात जनजागृती घडवून आणावी - सुप्रिया सुळे

भिऊ नका, राष्ट्रवादी तुमच्या पाठिशी

नगर : युवतींनी समाजातील कुप्रवृतींना घाबरून न जाता धैर्याने तोंड दिले पाहिजे. कायद्याची माहिती करून घ्या. मुलींच्या सुरक्षेबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देवू. युवतींनी कपड्यांनी नव्हे, विचाराने माॅडर्न व्हावे, असे आवाहन करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदरा सुप्रिया सुळे यांनी येथील विद्यार्थीनींची मने जिंकली. त्यांनी युवतींशी मुक्त संवाद साधला. महाविद्यालयीन युवतींचे प्रश्न समजावून घेतले. गप्पा मारल्या. त्यांचा स्वभाव युवतींना खूपच भावला.

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आज 'जागर जनसंवाद यात्रेचा' या उपक्रमाचा प्रारंभ खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाला. या यात्रेच्या माध्यमातून राज्यभर पुढील चार महिन्यांत शंभर महाविद्यालयांतील युवक-युवतींशी त्या संवाद साधणार आहेत. नगरमधील न्यू आर्टस महाविद्यलायत झालेल्या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, युवकचे अध्यक्ष अभिजित खोसे, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, प्राचार्य भास्कर झावरे उपस्थित होते. स्त्री-भ्रुणहत्या, युवतींची होणारी छेडछाड व अत्याचार, हुंडाबळी, युवक-युवतींची आत्महत्या अशा विविध विषयांबाबत युवतींशी संवाद साधून सुळे यांनी युवतींना बोलते केले. दुपारी कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात अशाच पद्धतीचा कार्यक्रम झाला.

भृणहत्येबाबत परिस्थिती बदलली
''पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात भ्रृणहत्या मोठ्या प्रमाणात होत होती. या विरोधात आम्ही आवाज उठवित महाराष्ट्रभर जनजागृती सुरू केली. आज परिस्थिती बदलली आहे. लोकांचे विचार बदलले आहेत. आता मुलींमध्येच जागृती होऊन भृणहत्येला आळा बसू लागला आहे. मात्र, राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. विद्यार्थ्यांमध्येही हवं तसं यश न मिळाल्याने आत्महत्या करण्याचे प्रकार होत आहेत. यासाठी आपणच सजग व्हावे. समाजात जनजागृती घडवून आणावी,'' असे आवाहन सुळे यांनी यावेळी केले.

संबंधित लेख