पिंपरीचे दोन्ही भाजप आमदार सेफ

2019 ची चाचपणीच नव्हे, तर तयारीही भाजपने देशात आणि राज्यात सुरु केली आहे. त्त्यासाठी त्यांनी नुकतेच सर्वेक्षण केले. त्यात त्यांचे 122 पैकी 39 आमदार हे 'डेंजर झोन'मध्ये आहेत असे दिसून आले. स्वबळावर सत्तेत यायचे असल्याने विजयी होऊ न या शकणाऱ्या आमदारांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता पक्षाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. त्यांच्याजागी निवडून येईल अशा उमेदवाराचा शोध सुरु झाला आहे. तो मिळाला नाही, तर विरोधी पक्षातील भक्कम व्यक्तीला गळाला लावण्याचे प्रयत्नही सुरु करण्यात आले आहेत.
पिंपरीचे दोन्ही भाजप आमदार सेफ

पिंपरी : पिंपरी-चिंचवड तसेच मावळमधील भाजपचे तिन्ही आमदार 'सेफ' आहेत, व राहतील अशी सद्यस्थिती आहे. उलट 2019 ला 'सेफ'च नव्हे, तर 'प्लस'मध्ये असू, असा आत्मविश्वास पिंपरी-चिंचवडचे भाजप अध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केला. त्यातून त्यांची सध्या शिवसेनेकडे असलेली शहरातील पिंपरीची जागा खेचून घेण्याचा विश्वास दिसून  आला. या राखीव मतदारसंघातून त्यांच्या कट्टर समर्थक व पिंपरी पालिकेच्या स्थायी समितीच्या विद्यमान अध्यक्षा सीमा सावळे या इच्छूक असून त्यांनी तशी तयारीही सुरु केली आहे.

2019 ची चाचपणीच नव्हे, तर तयारीही भाजपने देशात आणि राज्यात सुरु केली आहे. त्त्यासाठी त्यांनी नुकतेच सर्वेक्षण केले. त्यात त्यांचे 122 पैकी 39 आमदार हे 'डेंजर झोन'मध्ये आहेत असे दिसून आले. स्वबळावर सत्तेत यायचे असल्याने विजयी होऊ न या शकणाऱ्या आमदारांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता पक्षाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. त्यांच्याजागी निवडून येईल अशा उमेदवाराचा शोध सुरु झाला आहे. तो मिळाला नाही, तर विरोधी पक्षातील भक्कम व्यक्तीला गळाला लावण्याचे प्रयत्नही सुरु करण्यात आले आहेत.

दरम्यान, ज्या निकषावर 39 आमदार 'डेंजर झोन'मध्ये गेले आहेत, त्यातील एकही निकष पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या दोन आमदारांना लागू होत नसल्याचा पक्षाचा दावा आहे. लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे हे दोन पक्षाचे शहरातील आमदार आहेत. ते अनुक्रमे चिंचवड आणि भोसरीतून निवडून आले आहेत. तर, पिंपरी या शहरातील तिसऱ्या मतदारसंघात शिवसेनेचे अॅड. गौतम चाबूकस्वार आमदार आहेत. मतदारसंघातीलच नव्हे, तर संपूर्ण राज्याशी संबधित अनधिकृत बांधकाम व रेडझोनप्रश्नी भाजपच्या शहरातील आमदारांनी पाठपुरावा केला आहे. त्यातही लांडगे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु होत आहेत. या दोघा आमदारांच्या चारित्र्याबद्दल, तर त्यांचे विरोधकही काही बोलणार नाहीत, अशी स्थिती आहे.

भाजपमध्ये येण्यापूर्वी 2014 ला लांडगे,हे अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेला निवडून आलेले आहेत. त्यातून त्यांची ताकद अधोरेखित होत आहे. तर जगताप यांना विधानसभेच्या जोडीने विधानपरिषदेचाही अनुभव आहे. या दोघांचीही नावे राज्य मंत्रीमंडळाच्या होऊ घातलेल्या विस्तारात घेतली जात आहे. त्यातून ते सेफ असल्याचे अधोरेखित होत आहे.दुसरीकडे शहरातील आपल्याकडील दोन्ही जागा राखून तिसरीही काबीज करण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. त्याव्दारे विधानसभेलाही पिंपरीत 'शत प्रतिशत भाजप' करण्याचा त्यांचा इरादा आहे. गतवेळी मतविभागणीचा फटका पिंपरीत भाजपला बसला होता. त्यामुळे शिवसेनेची 'लॉटरी' लागली होती. यावेळी जागावाटपात 'आरपीआय'ला ही जागा देण्यात आली, तरी तेथून त्यांचा उमेदवार निवडून आणण्याची भाजपची ताकद आहे. तूर्त, ही जागा स्वतच लढण्याची तयारी त्यांनी सुरु केली आहे.तेथून सावळे यांच्यासारख्या तगड्या व कार्यक्षम नगरसेवकाला पुढे चाल देण्याचा पक्षाचा विचार आहे.

पिंपरी-चिंचवडप्रमाणे मावळचे आमदार बाळा भेगडे सेफ आहेत, अशी स्थिती आहे. त्यांनी आपला मतदारसंघ पक्षाचा बालेकिल्लाच बनविला आहे. एकनिष्ठ, तरुण, कार्यक्षम आणि चारित्र्यवान आमदार या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. राज्य मंत्रीमंडळ विस्तारात त्यांच्या नावाचाही विचार सुरु असल्याने ते सुरक्षित आमदार असल्याला दुजोराही मिळत
आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com