Maharashtra Political News Nashik Vikhe Congress | Sarkarnama

काँग्रेस कार्यकर्त्यांना नाही राहिले बालकांच्या आरोग्याचे भान

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

नाशिकमध्ये झालेल्या बालमृत्युंच्या पार्श्वभूमीवर विखे-पाटील यांनी रुग्णालयात जाऊऩ तेथिल स्थितीची पाहणी केली. विखे यांनी रुग्णालयात नवजात बालकांच्या 'एसएनसीयु' कक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासमवेत असलेल्या पदाधिकाऱ्यांनीही आत प्रवेश केला. सदरचा कक्ष नवजात बालकांचा असल्याने याठिकाणी प्रवेश निषिद्ध असतानाही विखे यांच्या पाठोपाठ अनेकांनी बळजबरीनेच प्रवेश केला. अनेकांना मज्जाव करण्याचा प्रयत्न कक्षाचे डॉक्‍टर्स व परिचारिकांनी केला. परंतु, त्यांनी कोणालाही जुमानले नाही.

नाशिक : राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नाशिकच्या रुग्णालयाला दिलेल्या भेटीच्या वेळी त्यांच्यासमवेत असलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पादत्राणांसह नवजात बालकांसाठीच्या 'एसएनसीयु' कक्षात प्रवेश केल्याने रुग्णालयाचे डाॅक्टर आणि परिचारिका हतबल झाल्याचा प्रकार काल इथे घडला.

नाशिकमध्ये झालेल्या बालमृत्युंच्या पार्श्वभूमीवर विखे-पाटील यांनी रुग्णालयात जाऊऩ तेथिल स्थितीची पाहणी केली. विखे यांनी रुग्णालयात नवजात बालकांच्या 'एसएनसीयु' कक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासमवेत असलेल्या पदाधिकाऱ्यांनीही आत प्रवेश केला. सदरचा कक्ष नवजात बालकांचा असल्याने याठिकाणी प्रवेश निषिद्ध असतानाही विखे यांच्या पाठोपाठ अनेकांनी बळजबरीनेच प्रवेश केला. अनेकांना मज्जाव करण्याचा प्रयत्न कक्षाचे डॉक्‍टर्स व परिचारिकांनी केला. परंतु, त्यांनी कोणालाही जुमानले नाही. एवढेच नव्हे तर श्री. विखे हे पादात्राणे काढून आत गेलेले असताना, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र पादत्राणांसह आतमध्ये प्रवेश केला. ज्या नवजात बालकांच्या मृत्युची दखल घेत आलेल्या पदाधिकाऱ्यांनी त्या बालकांच्याच जिवाला धोका पोहोचेल असे कृत्य केल्याने येथील डॉक्‍टर्स-परिचारिकांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे.

शहर अध्यक्ष अखेर सापडले
एरव्ही काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर पक्षाच्या कार्यालयातही फिरकत नाहीत. अनेक दिवसांपासून शहराध्यक्ष हरवले अशी चर्चा कार्यकर्त्यांत सुरु आहे. आज मात्र विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या कक्षाला भेट दिल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी लावलेल्या कॅमेऱ्यात छबी झळकावी म्हणून शहराध्यक्षांचा आटापिटा सुरु होता. श्री. विखे-पाटील हे जिल्हा शल्यचिकित्सकाच्या खुर्चीत बसल्यानंतर त्यांच्याशेजारी माजी मंत्री तर काही पदाधिकाऱ्यांनी खुर्च्या बळकावल्या. त्यामुळे आरोग्य उपसंचालिका, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्यधिकारी यांना बसायला तर नाहीच. परंतु, उभे राहण्यासाठीही जागा राहिली नव्हती. काही पदाधिकारी कॅमेऱ्यात आपली छबी यावी यासाठी धडपडत होते.

दरम्यान, ''नारायण राणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. ते पक्षातच आहेत. मात्र, त्यांच्या भाजप प्रवेशाविषयीच्या बातम्या सतत येत राहतात. अगदी विखे पाटील भाजपमध्ये जाणार अशा बातम्याही येत राहतात. त्याविषयी आश्‍चर्य वाटते. मला अद्यापही वाटते की ते भाजपमध्ये जाणार नाहीत,'' असा विश्वास विरोधी पक्षनेते डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. काल पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप प्रवेशाबाबत आपले मत व्यक्त केले.

दोन दिवसांपूर्वी राज्याचे वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी भाजपातील राणे यांच्या प्रवेशासंदर्भात वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे विचारणा केली असता विखे यांनी त्यावर बोलणे टाळण्याचा प्रयत्न केला. नंतर ते म्हणाले, ''राणे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. अजूनही ते काँग्रेसमध्येच आहेत. त्यामुळे ते भाजपात जातील असे वाटत नाही,'' असे सांगत विखे यांनी स्वत:च्या प्रवेशाच्या बातम्याविषयीही आश्‍चर्य व्यक्त केले. मात्र, अशा बातम्यामुळे काहींचे मनोरंजन होते असे सांगत त्यांनी यावर स्पष्ट भाष्य टाळले.

 

 

संबंधित लेख