Maharashtra Political News Nashik Sena Morcha | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

शिवसेनेच्या बैलगाडीने केला रास्ता रोको

संपत देवगिरे
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

नाशिकला दुपारी बाराला शालीमार चौकातून शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी चार बैलगाड्‌यांसह सुमारे तीनशे मीटर अंतरावरील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाने गेले. पक्षाचे कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी असल्याने प्रत्येक नेता महागड्या गाड्यांनी आल्याने या गाड्यांनीच परिसरात कोंडी झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यात बैलगाड्या आडव्या केल्याने काही काळ कोंडी झाली.

नाशिक : सरकार फसवणुक करते....खोटे बोलते...फक्त घोषणा करते.... ...मंत्री काहीच कामाचे नाहीत.....शिवसेनेचा हा शेवटचा मोर्चा आहे..... ही विधाने शिवसेना विरोधकांची नव्हे तर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देतांना केलेली विधाने आहेत.

शिवसेनेने राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. कर्जमुक्तीच्या घोषणेची तातडीने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी पक्षाच्या आदेशानुसार मोर्चा काढला. या मोर्चात राज्यमंत्री दादा भूसे, आमदार अनिल कदम यांसह अनेक जिल्हा परिषद सदस्य अनुपस्थित होते.

नाशिकला दुपारी बाराला शालीमार चौकातून शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी चार बैलगाड्‌यांसह सुमारे तीनशे मीटर अंतरावरील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाने गेले. पक्षाचे कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी असल्याने प्रत्येक नेता महागड्या गाड्यांनी आल्याने या गाड्यांनीच परिसरात कोंडी झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यात बैलगाड्या आडव्या केल्याने काही काळ कोंडी झाली. तासाभरात हा मोर्चा संपला. त्यात आमदार राजाभाऊ वाजे, आमदार योगेश घोलप, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख विजय करंजकर आदींच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

यावेळी आमदार वाजे म्हणाले, ''आम्ही ढोल वाजवले, निवेदने दिले. मेळावे घेऊन मागण्या केल्या, सहकार विभागाला शिष्टमंडळ भेटले मात्र निष्पन्न काहीच झाले नाही. त्यामुळे शिवसेना आता रस्त्यावर उतरेल. शिवसेना स्टाईलने आंदोलन होईल. त्याची सर्व जबाबदारी सरकारची असेल असा इशारा दिला. त्यानंतर तासाभरात हा मोर्चा संपला.''

पक्षाच्या आदेशानुसार मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे अन्य मंत्र्यांसमवेत मी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळात सहभागी झालो होते.- दादा भुसे, राज्यमंत्री.

मला काही वैयक्तीक कामे होती. त्यामुळे मोर्चाला गेलो नाही. त्याचे अन्य काही अर्थ काढू नये.- आमदार अनिल कदम.

 

संबंधित लेख