Maharashtra Political News Narayan Rane Sawantwadi Sarpanch | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

राणेंच्या नव्या पक्षाने खाते खोलले : पाच सरपंच बिनविरोध

अमोल टेंबकर
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाने तालुक्यात तब्बल पाच ग्रामपंचायतीवर सरपंच बसवून जिल्ह्यात प्रथमच खाते खोलले आहे. दरम्यान, यानंतर सुध्दा तालुक्यातील पस्तीसहून अधिक ग्रामपंचायती ताब्यात घेण्यात येणार असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेण्यात येणार आहे, असा दावा राणे समर्थक संजू परब यांनी आज येथे केला.

सावंतवाडी : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाने तालुक्यात तब्बल पाच ग्रामपंचायतीवर सरपंच बसवून जिल्ह्यात प्रथमच खाते खोलले आहे. दरम्यान, यानंतर सुध्दा तालुक्यातील पस्तीसहून अधिक ग्रामपंचायती ताब्यात घेण्यात येणार असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेण्यात येणार आहे, असा दावा राणे समर्थक संजू परब यांनी आज येथे केला.

परब यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंचायत समिती सभापती रवी मडगावकर, नियोजन सदस्य राजू बेग, नगरसेवक सुधीर आडीवरेकर आदी उपस्थित होते. यावेळी परब म्हणाले, ''जिल्ह्यात महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाची घोषणा केल्यानंतर राणेंच्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तयार करण्यात आलेल्या 'समर्थ विकास पॅनल'च्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यात तब्बल पाच ग्रामपंचायतीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने खाते खोलले आहे. तालुक्यातील 52 पैकी 50 ग्रामपंचायतीत आम्ही समर्थ विकास पॅनलच्या माध्यमातून उमेदवार उभे केले होते. त्यातील नेतर्डे, कवठणी, तळवणे, कलंबिस्त, वेर्ले आदी पाच ग्रामपंचायतीवर आमचे सरपंच बसले आहेत. तर वेर्ले ग्रामपंचायत आमच्याच ताब्यात येणार आहे.''

त्यांनी केलेल्या दाव्यानुसार तालुक्यातील अजून एकुण 35 ग्रामपंचायतीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरपंच बसणार आहे. तसेच जिल्ह्यात सुध्दा आता परिवर्तन घडणार आहे. त्यामुळे राणेंच्या विरोधात शिवसेना भाजपा आणि अन्य पक्ष असताना सुध्दा जिल्ह्यात सावंतवाडी तालुका राणेंच्या पाठिशी राहील्याचा दावा परब यांनी केला आहे.

परब पुढे म्हणाले, ''राणेंनी जाहीर केलेल्या नव्या पक्षात जिल्हयातील सर्व राजकीय पदाधिकारी लोकप्रतिनीधी आणि राणे समर्थक सहभागी झाले आहेत. यात जिल्हा परिषद अध्यक्षांसह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आदी सर्व पदाधिकार्‍यांचा समावेश आहे.''

संबंधित लेख