नांदेड- वाघाळा महानगरपालिकेसाठी 11 ऑक्टोबरला मतदान

निवडणूक कार्यक्रमनामनिर्देशनपत्रे दाखल करणे- 16 ते 23 सप्टेंबर 2017नामनिर्देशपत्रांची छाननी- 25 सप्टेंबर 2017उमेदवारी मागे घेणे- 27 सप्टेंबर 2017निवडणूक चिन्ह वाटप- 28 सप्टेंबर 2017मतदान- 11 ऑक्टोबर 2017मतमोजणी- 12 ऑक्टोबर 2017निकालांची राजपत्रात प्रसिद्धी- 13 आक्टोबर 2017
नांदेड- वाघाळा महानगरपालिकेसाठी 11 ऑक्टोबरला मतदान

बृहन्मुंबई, नागपूर, कोल्हापूर व पुण्यातील 5 रिक्तपदांसाठीदेखील मतदान

मुंबई : नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक; तसेच बृहन्मुंबई, पुणे व नागपूर महानगरपालिकेच्या प्रत्येकी एका आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या दोन रिक्तपदांच्या पोट निवडणुकांसाठी 11 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 12 ऑक्टोबर 2017 रोजी होईल. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.

सहारिया यांनी सांगितले की, नांदेड- वाघाळा महानगरपालिकेची मुदत 31 ऑक्टोबर 2017 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 5 लाख 50 हजार 439 असून मतदारांची संख्या सुमारे 3 लाख 96 हजार 580 इतकी आहे. एकूण 20 प्रभागांतील 81 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 41 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 15, अनुसूचित जमातींसाठी 2; तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 22 जागा राखीव आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्र. ‘116’, पुण्यातील  प्रभाग क्र. ‘21अ’ नागपूरमधील प्रभाग क्र. ‘35-अ’ आणि कोल्हापूरमधील प्रभाग क्र. ‘11’ व ‘77’ च्या रिक्तपदांच्या पोट निवडणुकांसाठीदेखील मतदान होत आहे. या सर्व ठिकाणी 16 सप्टेंबर 2017 पासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरूवात होईल. 11 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नांदेड- वाघाळा महानगरपालिका आणि पोट निवडणूक होत असलेल्या अन्य महानगरपालिकांच्या संबंधित प्रभागांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर ती संपुष्टात येईल. मतमोजणी 12 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.

निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशनपत्रे दाखल करणे-  16 ते 23 सप्टेंबर 2017

नामनिर्देशपत्रांची छाननी-      25 सप्टेंबर 2017

उमेदवारी मागे घेणे-                 27 सप्टेंबर 2017

 निवडणूक चिन्ह वाटप-            28 सप्टेंबर 2017

मतदान-                                  11 ऑक्टोबर 2017

 मतमोजणी-                             12 ऑक्टोबर 2017

निकालांची राजपत्रात प्रसिद्धी- 13 आक्टोबर 2017

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com