Maharashtra Political News Lalit Kolhe Jangaon | Sarkarnama

शिवसेनेच्या जैनांच्या नेतृत्वाखाली मनसेचे कोल्हे महापौर

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

जळगाव महापालिकेत शिवसेना नेते व माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली खानदेश विकास आघाडीचे बहुमत आहे. सत्तेसाठी त्यांना मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठींबा आहे. चार वर्षे खानदेश विकास आघाडीचा महापौर होता. शेवटच्या वर्षात मनसेतर्फे महापौरपदाची मागणी करण्यात आली. जैन यांनी ही मागणी मान्य केली.

जळगाव महापालिकेच्या मनसेला शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचा पाठींबा

जळगाव : मुंबईसह राज्यात शिवसेना आणि मनसे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. मात्र, जळगावात शिवसेनेचे माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील खानदेश विकास आघाडी पुरस्कृत मनसेचे ललीत कोल्हे महापौरपदी बिनविरोध विराजमान झाले आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांना पाठींबा दिला आहे.

जळगाव महापालिकेत शिवसेना नेते व माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली खानदेश विकास आघाडीचे बहुमत आहे. सत्तेसाठी त्यांना मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठींबा आहे. चार वर्षे खानदेश विकास आघाडीचा महापौर होता. शेवटच्या वर्षात मनसेतर्फे महापौरपदाची मागणी करण्यात आली. जैन यांनी ही मागणी मान्य केली. त्यानुसार महापौर पदासाठी मनसेचे ललीत कोल्हे यांनी अर्ज दाखल केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी अगोदरच पाठींबा जाहिर केला होता. महापालिकेत विरोधी पक्षनेता असलेल्या भाजपनेही पाठींबा जाहिर केला.

आज झालेल्या महापौर निवडीच्या विशेष सभेत पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी व महापालिकेचे प्रभारी किशोरराजे निबांळकर यांनी ललीत कोल्हे यांची बिनविरोध निवड झाली केली.महापौर निवडीनंतर सुरेशदादा जैन यांचे बंधू व खाविआचे नेते रमेश जैन यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. ललीत कोल्हे यांच्या घराण्याला राजकिय वारसा आहे, त्यांचे आजोबा (कै.)पंडितराव कोल्हे जळगावचे नगराध्यक्ष होते,त्यांच्या मातोश्री सौ. सिंधू कोल्हे यांनीही नगराध्यक्षपद भूषविले आहे. तर त्यांच्या काकू श्रीमती आशा दिलीप कोल्हे या जळगावच्या पहिल्या महापौर होत्या. ललीत कोल्हे यांचे वडील विजय कोल्हे विद्यमान नगरसेवक आहेत.

जैनांचा विश्‍वास सार्थ ठरविणार
महापौरपदाची सूत्रे ललीत कोल्हे त्यांनी माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्याकडून स्विकारली, यावेळी बोलतांना कोल्हे म्हणाले. सुरेशदादा जैन यांनी आपल्याला महापौरपद देवून विश्‍वास दाखवला आहे. जळगाव शहराचा सर्वांगिण विकास करून आपण तो विकास सार्थ ठरविणार आहोत. शहरातील  प्रश्‍न सोडविण्यासाठी प्राधान्य असेल, तर कर्जमुक्तीसाठीही आपला प्रयत्न राहिल. मुख्यंमत्र्यांच्या 25 कोटीच्या निधीबाबत जी समस्या निर्माण झाली त्याबाबत आमदार सुरेश भोळे यांच्याशी चर्चा करून सर्व वाॅर्डात सारखा विकास होईल याकडे आपण लक्ष देणार आहोत.

संबंधित लेख